Share Market  Sakal
Share Market

Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

Share Market Investment Tips: काल मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही तेजी दिसून आली.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: गुरुवारीही बाजार तेजीत राहिला. संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान बाजाराची सुरुवात सपाट झाली खरी पण व्यवहाराच्या उत्तरार्धात झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स-निफ्टी दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 348.80 अंकांच्या म्हणजेच 0.58 टक्क्यांच्या वाढीसह 60649.38 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 101.40 अंकांच्या म्हणजेच 0.57 टक्क्यांच्या वाढीसह 17915 च्या पातळीवर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

मंथली एक्स्पायरीच्या दिवशी बाजार स्थिर राहिला आणि सुमारे अर्धा टक्का वाढल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. रिअल्टी, आयटी आणि ऑटोसह बऱ्याचशा सेक्टर्समध्ये तेजी दिसून आली.

मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही तेजी दिसून आली. मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.5-0.8 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. निफ्टीने 17850 चा रझिस्टंस पार केला आहे.

आता तो 18100 च्या दिशेने जाण्यासाठी सज्ज दिसत आहे. पण, बाजारातील रिकव्हरी केवळ बँकिंग शेअर्समुळे आली आहे. इतर सेक्टर्समध्ये थोडीफार सुधारणा झाली.

निफ्टी गुरुवारी 17863 च्या आधीच्या स्विंग हायच्या वर बंद झाल्याचे शेअर खानचे जतीन गेडिया म्हणाले. निफ्टी आता 18100 चा पल्ला गाठू शकतो. मोमेंटम इंडिकेटरने डेली चार्टवर एक नवीन पॉझिटीव्ह क्रॉसओव्हर ट्रिगर केला आहे. त्यामुळे बाजारात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT