Share Market  Sakal
Share Market

Share Market Tips: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

शुक्रवारी शेअर बाजार काहीशा वाढीसह बंद होत सलग दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: शुक्रवारी शेअर बाजार काहीशा वाढीसह बंद होत सलग दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह बंद करण्यात यशस्वी झाले.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 118.57 अंकांनी अर्थात 0.19 टक्क्यांनी वाढून 62547.11 वर आणि निफ्टी 46.30 अंकांनी म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढून 18534.10 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

शुक्रवारी निफ्टी तेजीसह खुला झाला आणि ट्रेडिंग रेंजबाऊंड दिसल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. अखेर 45 अंकांच्या वाढीसह निफ्टी बंद झाला. आवर्ली चार्टवर, निफ्टी रिव्हर्स चॅनेलच्या खालच्या टोकाला (18500 – 18450) ट्रेड करत आहे.

यासोबतच, आवर्ली मुव्हिंग एव्हरेज आणि आवर्ली मोमेंटम इंडिकेटर पॉझिटीव्ह क्रॉसओवर दाखवत आहेत जे तेजीचे संकेत आहेत.

या आठवड्यात निफ्टीमध्ये कंसोलिडेशन दिसून आले आहे, असा विश्वास जतीन गेडिया यांनी व्यक्त केला. आता सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यापासून त्याला वेग येण्याची शक्यता आहे. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीमध्ये 18800 ची पातळी दिसू शकते.

18460-18420 झोनमध्ये निफ्टीला सपोर्ट दिसत आहे, तर 18600 - 18660 ला रझिस्टंस दिसत आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • मारुती (MARUTI)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • ट्रेंट (TRENT)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT