Share Market Sakal
Share Market

Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

सोमवारी बाजारात सुरुवातीच्या तेजीनंतर प्रॉफिट बुकींग दिसून आली.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: सोमवारी बाजारात सुरुवातीच्या तेजीनंतर प्रॉफिट बुकींग दिसून आली, त्यानंतरही बेंचमार्क इंडेक्स हिरव्या रंगात बंद झाले.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 240.36 अंकांनी अर्थात 0.38 टक्क्यांनी वाढून 62787.47 वर आणि निफ्टी 59.70 अंकांनी म्हणजेच 0.32 टक्क्यांनी वाढून 18593.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

जागतिक बाजारातील तेजीने भारतीय बाजारपेठेतही उत्साह भरल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. या आठवड्याच्या शेवटी आरबीआयच्या पतधोरणाच्या आधी बँकिंग, आर्थिक आणि इतर दर-संवेदनशील शेअर्समध्ये मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे.

तांत्रिकदृष्ट्या, डेली चार्टवर, निफ्टीने एक लहान बियरश कँडल तयार केली आहे जी बुल्स आणि बियर्स यांच्यातील अनिश्चितता दाखवते आहे.

जोपर्यंत निफ्टी 18550 च्या वर ट्रेड करत आहे तोपर्यंत अपट्रेंड चालू राहण्याची शक्यता आहे. याच्या वर इंडेक्स 18650-18700 पर्यंत जाऊ शकतो.

दुसरीकडे, निफ्टी 18550 च्या खाली गेल्यास विक्रीचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास इंडेक्स 18500-18450 पर्यंत घसरू शकतो.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा (M&M)

  • अ‍ॅक्सिस बँक (AXISBANK)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • एल अ‍ॅण्ड टी (LT)

  • ग्रासिम (GRASIM)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • ॲस्ट्रल (ASTRAL)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

Latest Marathi News Updates : पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्काराचा निर्णय बदलला? खेळाडूंनी सोडलं हॉटेल

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

SCROLL FOR NEXT