Share Market Tips Sakal
Share Market

Share Market Investment Tips: कालच्या घसरणीनंतर आज 'या' शेअर्समध्ये करा गुंतवणूक; काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आरबीआयच्या निर्णयामुळे शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला आहे.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: गुरुवारी दिवसभरातील चढ-उतारानंतर बाजार घसरणीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 294.32 अंकांनी अर्थात 0.47 टक्क्यांनी घसरून 62848.64 वर आणि निफ्टी 91.90 अंकांनी म्हणजेच 0.49 टक्क्यांनी घसरून 18634.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

शेवटच्या ट्रेडिंग तासात झालेल्या मोठ्या करेक्शनमुळे सेन्सेक्स 63000 च्या खाली गेला. नुकत्याच झालेल्या तेजीनंतर गुरुवारी रिऍल्टी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

शिवाय एमपीसीने आधीच दरांमध्ये यथास्थिती राखणे अपेक्षित होते. पण या आर्थिक वर्षातील महागाईवर आरबीआयच्या भाष्यामुळे बाजारातील सेंटीमेंटवर परिणाम झाला.

तांत्रिकदृष्ट्या, निफ्टीने डेली चार्टवर एक लाँग बियरीश कँडल तयार केली आहे, जी सध्याच्या पातळीपासून बाजारात आणखी कमजोरी दर्शवते. पण, इंडेक्सचा मिडियम टर्म कल तेजीचा राहिला आहे.

जोपर्यंत इंडेक्स 18725 च्या खाली व्यापार करत आहे, तोपर्यंत टेक्निकल करेक्शन चालू राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान निफ्टी 18600-18550 पर्यंत घसरू शकतो. 18520 च्या स्टॉप लॉससह कॉन्ट्रा ट्रेडर्स निफ्टीमध्ये 18550 च्या आसपास लाँग पोझिशन्स घेऊ शकतात.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • ग्रासिम (GRASIM)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • सन फार्मा (SUNPHARMA)

  • टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT