Top 10 Shares esakal
Share Market

Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

निफ्टी 40.20 अंकांच्या म्हणजेच 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 19306 वर बंद झाला.

सकाळ ऑनलाईन टीम

Share Market : सोमवारी अखेर सलग दोन सुरु असलेली बाजारातली घसरण थांबली. सोमवारी निफ्टी 19300 च्या वर बंद झाला. या ट्रेडिंग सत्रात एफएमसीजी आणि आयटी सोडून सर्व सोक्टरल इंडेक्स हिरव्या रंगात बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 110.09 अंकांच्या अर्थात 0.17 टक्क्यांच्या वाढीसह 64996.60 च्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 40.20 अंकांच्या म्हणजेच 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 19306 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

एजीएमपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आणि त्यामुळे बाजाराने दिवसभरातील बहुतांश नफा गमावला आणि किरकोळ वाढीसह बंद झाल्याचे सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. बाजाराला सोमवारी चांगल्या जागतिक संकेतांचा सपोर्ट मिळाला. अमेरिकेतील महागाईचा उच्च दर लक्षात घेता यूएस फेडकडून दर वाढवण्याच्या भीतीने बाजार दबावाखाली राहिला. याशिवाय चीनमधील मंदीची चिंता आणि देशांतर्गत बाजारात एफआयआयची विक्री यामुळेही बाजारावर दबाव आला.

निफ्टीने 19350 चा इंट्राडे रझिस्टन्स ओलांडला आहे. पण उच्च पातळीवर प्रॉफीट बुकींग झाल्यामुळे तो त्याच्या वर बंद होऊ शकले नाही. निफ्टीने त्याच्या सपोर्ट लेव्हलजवळ डबल बॉटम फॉर्मेशन केले आहे. हे सध्याच्या लेव्हलवरून पुलबॅक रॅलीची जोरदार शक्यता दाखवत आहे. इंट्राडे ट्रेडर्ससाठी, जोपर्यंत निफ्टी 19220 वर टिकून राहते तोपर्यंत अपट्रेंड चालू राहण्याची शक्यता आहे. याच्या वर, निफ्टीमध्ये 19400-19450 पर्यंत पुलबॅक रॅली पाहता येईल. दुसरीकडे निफ्टी 19220 च्या खाली गेल्यावर विक्रीची शक्यता वाढू शकते. (Share Market)

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

पॉवरग्रीड (POWERGRID)

एल अँड टी (LT)

सिप्ला (CIPLA)

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

बीपीसीएल (BPCL)

भारत फोर्ज (BHARATFORG)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

फेडरल बँक (FEDERALBNK)

पीएनबी (PNB)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO) (Investment)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT