Share Market Nifty slips below 21,750, Sensex falls 350 pts dragged by financial stocks  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंग! सेन्सेक्स 350 अंकांनी घसरला; कोणते शेअर्स वधारले?

Profit booking in the stock market! Sensex falls 350 points; Know Which stocks rose: सोमवारी शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकींग झाली. आज प्रमुख बाजार निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 354 अंकांनी घसरून 71,731 वर आला. निफ्टीही 82 अंकांनी घसरून 21,771 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 5 February 2024: सोमवारी शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकींग झाली. आज प्रमुख बाजार निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 354 अंकांनी घसरून 71,731 वर बंद झाला. निफ्टीही 82 अंकांनी घसरून 21,771 वर बंद झाला. बँकिंग, एफएमसीजी, आयटी आणि मीडिया क्षेत्रांसह प्रमुख बाजार निर्देशांकांमध्ये विक्री झाली, तर ऑटो आणि फार्मा क्षेत्रामध्ये खरेदी झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँकसह सर्व निर्देशांक घसरणीसह बंद झाले. टाटा मोटर्स, कोल इंडिया, बीपीसीएल आणि सन फार्मा यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. (Status of Regional Index)

शेअर बाजार घसरणीसह बंद

कोणते शेअर्स वाढले?

सोमवारी शेअर बाजारात वाढ होणाऱ्या शेअर्समध्ये सिप्ला, ओएनजीसी आणि महिंद्राच्या शेअर्सचा समावेश होता. तर घसरण झालेल्या शेअर्समध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी आणि बजाज फिनसर्व्हच्याशेअर्सचा समावेश होता. (Which stocks rose?)

पंजाब आणि सिंध बँकेचे शेअर्स 7 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले तर ओम इन्फ्रा, NMDC, महिंद्रा अँड महिंद्रा, पटेल इंजिनीअरिंग, एक्साइड इंडस्ट्रीज, ब्रँड कॉन्सेप्ट आणि कामधेनू लिमिटेडचे ​​शेअर्स वधारले.

कोणते शेअर्स वाढले?

52 आठवड्यांच्या उच्चांकावर कोणते शेअर्स?

टाटा मोटर्स, कोल इंडिया, बीपीसीएल, सिप्ला, सन फार्मा, ओएनजीसी आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत तर पेटीएम, नवीन फ्लोरिन, एसबीआय कार्ड, शारदा क्रॉप केम आणि वेदांत फॅशनचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. (Which stocks are at 52-week highs?)

गुंतवणूकदारांचे 5,200 कोटी रुपयांचे नुकसान

2 फेब्रुवारी 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 382.82 लाख कोटी रुपये होते. आज म्हणजेच 5 फेब्रुवारी 2024 रोजी ते 382.77 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांचे भांडवल सुमारे 52 हजार कोटींनी कमी झाले आहे. (5,200 crore loss to investors)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT