Share Market Today Sakal
Share Market

Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

दिवसभराच्या अस्थिरतेसह बाजारात कालच्या घसरणीतून थोडी रिकव्हरी दिसली

सकाळ डिजिटल टीम

Share Market : एफएमसीजीआणि ऑटो शेअर्समधील खरेदीमुळे भारतीय बेंचमार्क इंडेक्स गुरुवारी वाढीसह बंद झाले. दिवसभराच्या अस्थिरतेसह बाजारात कालच्या घसरणीतून थोडी रिकव्हरी दिसली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 98.84 अंकांनी अर्थात 0.16 टक्क्यांनी वाढून 61872.62 वर आणि निफ्टी 35.80 अंकांनी म्हणजेच 0.20 टक्क्यांनी वाढून 18321.20 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बेंचमार्क इंडेक्समध्ये गुरुवारी अस्थिरता दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. निफ्टी 36 अंकांनी वाढून बंद झाला. सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, रियल्टी आणि डिजिटल इंडेक्स प्रत्येकी 1 टक्क्यांच्या आसपास वाढले, तर पीएसयू बँक आणि फार्मा शेअर्समध्ये इंट्राडे प्रॉफिट बुकींग दिसून आली.

तांत्रिकदृष्ट्या, सकाळच्या इंट्राडे सेलऑफनंतर, निफ्टीने पुन्हा एकदा 20-दिवसांच्या एसएमएजवळ सपोर्ट घेतला आणि तिथून रिकव्हरी झाली. डेली चार्टवर एक बुलिश अर्थात तेजीची कँडल तयार केली जी आणखी तेजीचे संकेत देत आहे.

आता 20-दिवसीय एसएमए किंवा 18220 ची पातळी निफ्टीसाठी महत्त्वाचा सपोर्ट बनला आहे. याच्या वर इंडेक्स 18400-18450 ची लेव्हल पुन्हा टेस्ट करु शकतो. दुसरीकडे, 20-दिवस एसएमए किंवा 18220 च्या खाली एक ब्रेक अपट्रेंड कमजोर होईल आणि बाजार 18150-18100 च्या दिशेने खाली सरकू शकते. (Investment)

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

आयटीसी (ITC)

भारती एअरटेल (BHARTIARTL)

डिव्हीस लॅब (DIVISLAB)

ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

ऍस्ट्रल (ASTRAL)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT