Share Market opening latest updates marathi market all time high Nifty scales fresh peak of 20,813.1; Sensex at 69,306.97; Nifty Bank at 46,933.15 5 december 2023  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची रेकॉर्डब्रेक तेजी सुरूच; सेन्सेक्स 69000 पार, निफ्टीनेही गाठला उच्चांक

Share Market Opening: शेअर बाजारातील विक्रमी वाढ मंगळवारीही कायम आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 5 december 2023: शेअर बाजारातील विक्रमी वाढ मंगळवारीही कायम आहे. प्रमुख बाजार निर्देशांक आज नवीन सर्वकालीन उच्चांकावर व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्सने प्रथमच 69,306 आणि निफ्टीने 20,813 चा स्तर ओलांडला आहे.

सध्या निफ्टी 20,736 आणि सेन्सेक्स 69000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बाजारातील सर्वांगीण खरेदीमध्ये बँकिंग क्षेत्र आघाडीवर आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपने देखील 344 लाख कोटी रुपयांची विक्रमी पातळी ओलांडली आहे.

मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात मल्टी-बॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये पटेल इंजिनीअरिंग, ओम इन्फ्रा, देवयानी इंटरनॅशनल, महिंद्रा अँड महिंद्रा, कामधेनू लिमिटेड, टाटा मोटर्स, स्टोव्ह क्राफ्ट, एक्साइड इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. जिओ फायनान्शिअल, युनि पार्ट्स इंडिया लिमिटेडचे ​​शेअर्स किंचित घसरणीसह व्यवहार करत होते.

आशियाई बाजारात विक्री

आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये विक्री दिसून येत आहे. GIFT NIFTY मध्ये 0.24 टक्के आणि Nikkei 225 मध्ये 1.32 टक्के घसरण झाली आहे. स्ट्रेट टाइम्समध्ये 1.40 टक्के आणि हँग सेंगमध्ये 1.72 टक्के घसरण झाली. तैवान वेटेड 0.80 टक्क्यांनी घसरला आहे, तर कोस्पी देखील 0.33 टक्के आणि शांघाय कंपोझिट 0.71 टक्के घसरण दाखवत आहे.

सुरुवातीच्या व्यापारात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांकात किंचित वाढ झाली होती, तर निफ्टी आयटी किंचित घसरणीसह व्यवहार करत होते. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, बीपीसीएल आणि आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT