Share Market Sakal
Share Market

Share Market Opening: सलग 11 दिवसांच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण, कोणत्या शेअर्सचे झाले नुकसान?

Share Market Opening: जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 18 September 2023: सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. BSE सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांनी घसरला आहे आणि 67,600 च्या जवळ व्यवहार करत आहे. सलग 11 दिवसांपासून सुरू असलेला बाजारातील तेजी थांबली आहे.

निफ्टीही 60 अंकांनी घसरून 20,100 च्या पातळीवर घसरला आहे. आयटी शेअर्सच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव आहे. एचसीएल टेक, इन्फोसिस, विप्रो हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले , तर एचडीएफसी लाइफचा शेअर सर्वाधिक तेजीत आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्सवर भारती एअरटेलचे शेअर्स 1.43 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे इन्फोसिस आणि एचसीएल टेकचे शेअर्स प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत होते.

याशिवाय टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, विप्रो, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती, नेस्ले इंडिया आणि एचयूएल यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, पॉवरग्रीड, सन फार्मा, टायटन, एनटीपीसी, एसबीआय आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.

Share Market Opening 18 September 2023 (S&P BSE SENSEX)

शुक्रवारी, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, सेन्सेक्स 400 हून अधिक अंकांनी वधारला आणि 67,838.63 अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान, सेन्सेक्सने 67,927.23 अंकांची नवीन सार्वकालिक उच्च पातळी गाठली होती.

निफ्टी 90 अंकांनी वधारला आणि नवीन विक्रमासह 20,200 अंकांच्या जवळ बंद झाला. शुक्रवारी बाजार सलग 11व्या दिवशी तेजीत होता. गेल्या आठवड्याबद्दल बोलायचे झाल्यास, संपूर्ण आठवड्यात सेन्सेक्स 1,239.72 अंकांनी आणि निफ्टी 1.87 टक्क्यांनी वधारला. देशांतर्गत बाजारात सलग तीन आठवडे तेजीचा कल होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT