Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today BPCL, Coal India among top blue-chip gainers, TCS slips 1 percent 22 November 2023  Esakal
Share Market

Share Market Opening: सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचित वाढ; TCSचे शेअर्स घसरले

Share Market Opening: सेन्सेक्सने 65,950 चा टप्पा ओलांडला आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 22 November 2023:

संमिश्र जागतिक संकेतांमुळे स्थानिक बाजार बुधवारी सपाट उघडला. BSE सेन्सेक्सने 65,950 चा टप्पा ओलांडला आहे. निफ्टी देखील 19,800 च्या जवळ व्यवहार करत आहे. निफ्टीमध्ये दीड टक्क्यांच्या वाढीसह बीपीसीएलचा शेअर अव्वल ठरला आहे.

तर TCS मध्ये किंचित घसरण नोंदवली जात आहे. बँकिंग आणि रियल्टी क्षेत्रातून बाजारावर दबाव येत आहे. त्याचबरोबर ऑटो, एफएमसीजी आणि फार्मा सेक्टरमध्ये खरेदी होताना दिसत आहे.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 23 शेअर्स वाढताना दिसत आहेत तर 7 शेअर्स घसरत आहेत. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढ असणाऱ्या शेअर्समध्ये टाटा मोटर्स 0.72 टक्के, पॉवर ग्रिड 0.67 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज 0.54 टक्के, टायटन 0.50 टक्के आणि भारती एअरटेल 0.46 टक्के तेजीत आहेत. फार्मा प्रमुख कंपनी सन फार्माचे शेअर्स 0.44 टक्क्यांनी वाढले आहेत.

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

NSE निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 34 शेअर्स तेजीत आहेत आणि 16 शेअर्स घसरले आहेत. निफ्टीच्या टॉप गेनर्सपैकी बीपीसीएल 2.40 टक्क्यांनी आणि टाटा कंज्यूमर्स 1.17 टक्क्यांनी वर आहेत. एचडीएफसी लाइफ 0.91 टक्के, टायटन 0.81 टक्के आणि सिप्ला 0.74 टक्के वाढीसह व्यवहार करत आहे.

बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, गौतम अदानी समूहाच्या नऊ कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे शेअर्स वधारत होते, तर एसीसी लिमिटेड, अंबुजा सिमेंट आणि अदानी ग्रीन एनर्जी यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

मल्टीबॅगर परतावा देणार्‍या शेअर्समध्ये ओम इन्फ्रा लिमिटेड, पटेल इंजिनियरिंग लिमिटेड, कामधेनू लिमिटेड, टाटा मोटर्स, स्टोव्ह क्राफ्ट, गति लिमिटेड, देवयानी इंटरनॅशनल आणि एक्साइड इंडस्ट्रीजचे शेअर्स वाढले होते तर महिंद्रा अँड महिंद्रा, जिओ फायनान्शियल. लि.च्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात होती.

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की निफ्टी 19100 ते 19800 च्या रेंजमध्ये व्यवहार करू शकतो. गुरुवारी वॉल स्ट्रीटवर व्यापार बंद आहे, त्याचप्रमाणे शुक्रवारीही केवळ अर्धा दिवस बाजारात व्यवहार होईल.

Tata Technology, IREDA आणि FedBank Financial Services चे IPO भारतीय शेअर बाजारात येणार आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर यावेळी तुम्ही निवडक शेअर्समध्येच गुंतवणूक करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT