Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 500 अंकांनी खाली, HDFC बँकेच्या शेअरची काय स्थिती?

Share Market Opening: निफ्टी 60 अंकांच्या घसरणीनंतर 20,130 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 20 September 2023: शेअर बाजार बुधवारी घसरणीसह उघडला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारावर दबाव आहे. याशिवाय हेवीवेट शेअर्सच्या विक्रीमुळेही बाजारात दबाव आहे. BSE सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी घसरला आहे आणि 67,100 च्या जवळ आला आहे. निफ्टीही 60 अंकांच्या घसरणीनंतर 20,130 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

बाजार उघडण्यापूर्वीच दबावाची स्पष्ट चिन्हे दिसत होती. गिफ्टी निफ्टीमध्ये निफ्टी फ्युचर्स सकाळी 11 अंकांनी घसरला होता. प्री-ओपनमध्ये देशांतर्गत बाजार मोठ्या प्रमाणात घसरण्याची चिन्हे दिसत होती.

प्री-ओपन सत्रादरम्यान, सेन्सेक्स 765 अंकांपेक्षा अधिक घसरला होता आणि 66,850 अंकांच्या खाली गेला होता. त्याच वेळी, निफ्टी 150 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 20 हजार अंकांच्या खाली गेला होता.

Share Market Opening Latest Update 20 September 2023

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्सवर एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, टाटा स्टील, भारती एअरटेल, इन्फोसिस, मारुती, कोटक महिंद्रा बँक, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, विप्रो, टायटन, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, SBI, नेस्ले इंडिया, ITC, TCS, NTPC आणि टाटा मोटर्सचे शेअर्स घसरले आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्सवर आज लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि सन फार्मा तेजीसह व्यवहार करत होते.

आशियाई बाजारातही घसरण आहे. जपानचा निक्की 0.36 टक्क्यांनी घसरला आहे, तर हाँगकाँगचा हँग सेंग 0.59 टक्क्यांनी घसरला आहे. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या निकालांपूर्वी भारतीय बाजारात घसरण होत आहे.

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हीके विजयकुमार म्हणाले की, आगामी काळात बाजाराला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. ब्रेंट क्रूडची किंमत 94 डॉलर ओलांडत आहे, त्याचवेळी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : बाणेर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूकीस अडथळा

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT