Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today HDFC, TCS shine 11 October 2023 Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

Share Market Opening: BSE सेन्सेक्स 350 हून अधिक अंकांच्या वाढीसह 66,450 च्या जवळ व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 11 October 2023: बुधवारी शेअर बाजारात जोरदार खरेदीची नोंद झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स 350 हून अधिक अंकांच्या वाढीसह 66,450 च्या जवळ व्यवहार करत आहे. निफ्टी देखील 100 अंकांनी वाढून 19800 च्या जवळ व्यवहार करत आहे.

बाजारातील चौफेर खरेदीत बँकिंग, ऑटो आणि फार्मा शेअर्स आघाडीवर आहेत. निफ्टीमध्ये दीड टक्क्यांच्या वाढीसह डॉ. रेड्डीजचा शेअर व्यवहार करत आहे, तर कोल इंडिया घसरणीसह व्यवहार करत आहे.

कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात किंचित वाढ झाली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या सर्व नऊ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स सर्वाधिक 2.45 टक्क्यांनी वाढले तर अदानी पॉवर लिमिटेडचे ​शेअर्स 2.4 टक्क्यांनी वाढले. अदानी टोटल गॅस आणि एनडीटीव्हीचे शेअर्सही 1.8 टक्क्यांनी वाढले. अदानी विल्मर, एसीसी लिमिटेड, अंबुजा सिमेंट, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्सही तेजीत होते.

पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, एनबीसीसी इंडिया लिमिटेड, येस बँक आणि व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

Share Market Opening Latest Update 11 October 2023 (S&P BSE SENSEX)

कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

बुधवारी शेअर बाजाराच्या व्यवहारात निफ्टीने 19800 चा टप्पा पार केला होता. शेअर बाजारातील व्यवहारात इन्फिबीम अॅव्हेन्यूज, बँक ऑफ बडोदा यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर कोल इंडिया, एसबीआय लाइफ, पॉवर ग्रिड आणि ब्रिटानियाचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बहुतांश शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात, आयसीआयसीआय बँक, अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो आणि टाटा कंझ्युमरचे शेअर्स नफा नोंदवत होते, बुधवारी सनटेक रियल्टी, केपीआयटी टेक, फिनिक्स मिल्स, कल्याण ज्वेलर्स, एमसीएक्स इंडिया आणि ग्लोबल हेल्थचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्च पातळीवर व्यवहार करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आंदोलनाची वेळ संपली, कोर्टाचा आदेश घेऊन पोलिस आंदोलनस्थळी दाखल

Mumbai Metro: आता गर्दीला रामराम! मेट्रो प्रवाशांसाठी भूमिगत वॉकवेची भन्नाट योजना, नवीन आठ प्रस्तावांना मंजुरी

Family Pension Rules: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून कुटुंब पेन्शनसाठी नवीन नियम जारी, आता मुलांना वडिलांची पेन्शन कधी मिळणार? वाचा...

'सर... माझं ब्रेकअप झालय' Gen Z कर्मचाऱ्याने बॉसला पाठवला मेल, बॉसला दया आली आणि १० दिवसांची सुट्टी मंजूर झाली

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी शरद पवार पक्ष रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व ५९ जागांवर निवडणूक लढवणार

SCROLL FOR NEXT