Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today RIL gains, M&M Financial down 7 percent 30 October 2023  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार पुन्हा घसरला; निफ्टी 19,000 च्या खाली, आयटी-बँकिंग क्षेत्रावर दबाव

Share Market Opening: सेन्सेक्स 150 हून अधिक अंकांनी घसरला आणि 63,600 च्या पातळीवर पोहोचला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 30 October 2023: सोमवारी बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. BSE सेन्सेक्स 150 हून अधिक अंकांनी घसरला आणि 63,600 च्या पातळीवर पोहोचला. निफ्टीही आज पुन्हा 19000 च्या खाली घसरला. बँकिंग, एफएमसीजी, आयटी क्षेत्रांचा बाजारावर दबाव आहे. तर मेटल आणि सरकारी बँकिंग क्षेत्रात खरेदीची नोंद होत आहे.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

सुरुवातीच्या सत्रात बहुतांश मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरत आहेत. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 25 शेअर्सनी आज घसरणीसह व्यवहार सुरू केला आहे. बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

टायटन, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, आयटीसी यांसारखे मोठे शेअर्सही घसरले आहेत. दुसरीकडे, रिलायन्स इंडस्ट्रीज सुमारे 1 टक्के तेजीसह व्यवहार करत आहे. टेक महिंद्रा आणि TCS सारख्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे.

Share Market Opening 30 October 2023 (S&P BSE SENSEX)

'या' कारणांमुळे बाजारात घसरण

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी बाजाराने चांगला कमबॅक केला होता. त्यापूर्वी सलग सहा दिवस बाजारात घसरण होत होती.

जागतिक बाजारातील दबाव, FPIs ची सतत विक्री, दुसऱ्या तिमाहीत कंपन्यांचे निराशाजनक आर्थिक निकाल आणि अमेरिकेतील सरकारी रोखे उत्पन्नात झालेली विक्रमी वाढ यासारख्या घटकांमुळे देशांतर्गत बाजार घसरला होता. सहादिवसांत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 3-3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

जागतिक बाजारावर दबाव

जागतिक बाजारात अजूनही दबाव आहे. शुक्रवारी अमेरिकन बाजारावर दबाव होता. डाऊ जोन्स सरासरी 1.12 टक्क्यांनी घसरला होता.

तर नॅस्डॅक कंपोझिट इंडेक्समध्ये 0.38 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. तसेच S&P 500 0.48 टक्क्यांनी घसरून बंद झाला. आजच्या व्यवहारात आशियाई बाजार घसरले आहेत. जपानचा निक्की 1.23 टक्के, तर हाँगकाँगचा हँग सेंग 0.39 टक्क्यांनी घसरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT