Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार उघडताच घसरला; सेन्सेक्स 66,000 च्या जवळ, कोणत्या शेअर्सवर दबाव?

Share Market Opening: BSE सेन्सेक्स जवळपास 100 अंकांनी घसरून 65,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 25 September 2023: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. मात्र, काही मिनिटांतच बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरले. BSE सेन्सेक्स जवळपास 100 अंकांनी घसरून 65,900 च्या पातळीवर आला आहे. निफ्टीही किंचित घसरला आणि 19,650 च्या खाली आला आहे.

बँकिंग-आयटी क्षेत्रात विक्री

बाजारातील मंदीमुळे आयटी आणि बँकिंग क्षेत्रात विक्री होत आहे. निफ्टीमध्ये अॅक्सिस बँकेचा शेअर 1.25 टक्क्यांच्या घसरणीसह टॉप लूझर आहे. तर, बजाज फायनान्सचे शेअर्स सुमारे 3 टक्क्यांनी वाढले आहेत. जीएसटी नोटीसमुळे डेल्टा कॉर्पचे शेअर्स 10 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर घसरले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

बीएसई सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात, अॅक्सिस बँकेचे शेअर्स सर्वात मोठ्या घसरणीसह व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे इन्फोसिस, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, आयटीसी, लार्सन अँड टुब्रो, नेस्ले इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन आणि टीसीएस यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

Share Market Opening 25 September 2023 (S&P BSE SENSEX)

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात, बजाज फायनान्स सर्वात जास्त 1.39 टक्के वाढीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, मारुती आणि एचडीएफसी बँकेचे तेजीसह व्यवहार करत होते.

NSE IX वर, गिफ्ट निफ्टी 45 ​​अंकांच्या किंवा 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 19,687.50 अंकांवर व्यवहार करत होता. यावरून सोमवारी दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळत होते. मात्र, सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स 95 अंकांनी घसरला. त्याच वेळी निफ्टी 19,670 अंकांच्या खाली घसरला.

अमेरिकन बाजारात घसरण सुरूच

शुक्रवारी अमेरिकन बाजारही घसरणीसह बंद झाला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज 0.31 टक्क्यांनी खाली आले. तर Nasdaq कंपोझिट इंडेक्समध्ये 0.09 टक्के आणि S&P 500 इंडेक्समध्ये 0.23 टक्के घसरण दिसून आली. सोमवारच्या व्यापार सत्रात आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT