share market  sakal
Share Market

Share Market Opening: चांगल्या जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्समध्ये 250 अंकांची वाढ, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

Share Market Opening: निफ्टी 80 अंकांनी वाढून 19,400 च्या जवळ व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 30 August 2023: चांगल्या जागतिक संकेतांमुळे शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहे. BSE सेन्सेक्स 250 अंकांच्या वाढीसह 65,350 च्या वर गेला आहे. निफ्टीही 80 अंकांनी वाढून 19,400 च्या जवळ व्यवहार करत आहे.

Share Market Opening Latest Update 30 August 2023 (S&P BSE SENSEX)

मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये तेजी

बाजाराच्या तेजीला मेटल आणि रियल्टी क्षेत्राचा पाठिंबा मिळत आहे. निफ्टी जिओ फायनान्शिअलचा शेअर 4 टक्क्यांच्या तेजीसह सर्वाधिक वाढणारा आहे. तर बीपीसीएलचा शेअर सर्वाधिक तोट्यात आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारात तेजीची नोंद झाली.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

जिओ फिन 3.09 टक्क्यांच्या उसळीसह सेन्सेक्सवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे टाटा स्टील, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, अॅक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, टायटन, विप्रो आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

पॉवरग्रीडचा शेअर सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 0.52 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एशियन पेंट्सचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

NSE IX वर, GIFT निफ्टी 18 अंकांच्या म्हणजेच 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 19,529 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून आज दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

US Iran War: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा...'; लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनानंतर इराणचा ट्रम्प यांना इशारा, आंतरराष्ट्रीय राजकारण तापलं

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

Latest Marathi News Live Update : आसाम रायफल्सच्या वाहनांवर सुखोवीजवळ संशयित IED स्फोट

Bloating Hidden Health Conditions: दूध-ग्लूटेन बंद करूनही पोट फुगतंय? डॉ. सेठी सांगतात, 'हे' ४ आजार असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT