Share Market Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची नकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स 61,700 च्या जवळ, 'या' शेअर्समध्ये मोठी विक्री

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात विक्री दिसून येत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening 12 May 2023: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात विक्री दिसून येत आहे. कमकुवत जागतिक संकेत हे शेअर बाजारातील घसरणीचे कारण आहेत. त्यामुळे बाजारात विक्री होत आहे. मीडिया, फार्मा, मेटल आणि आयटी शेअर्स घसरणीमध्ये पुढे आहेत.

डिव्हिस लॅबचा शेअर निफ्टीमध्ये सुमारे 3 टक्क्यांनी घसरत आहे, जो निर्देशांकाचा सर्वाधिक घसरणीचा शेअर आहे. निकालानंतर आयशर मोटारच्या शेअरने जोरदार झेप घेतली आहे.

शेअरमध्ये 6 टक्क्यांहून अधिक तेजी आहे. याआधी गुरुवारी सेन्सेक्स 35 अंकांनी घसरून 61,904 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 18 अंकांनी घसरून 18,297 वर बंद झाला.

Share Market Opening 12 May 2023

सुरुवातीच्या व्यवसायामध्ये मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी केवळ 6 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.

तर 24 कंपन्यांचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात घसरणीसह व्यवहार करत होते. आयटी आणि बँकिंग शेअर्स आज घसरले आहेत. अदानी समूहाबाबत सुरू असलेल्या सेबीच्या तपासाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

'या' शेअर्समध्ये तेजी:

टाटा मोटर्स 0.60 टक्क्यांच्या वाढीसह सेन्सेक्समध्ये सर्वाधिक तेजीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँकंचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.

'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात एचसीएल टेक 0.94 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचडीएफसी, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, टीसीएस, भारती एअरटेल आणि आयटीसी शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

त्याचप्रमाणे बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, विप्रो आणि नेस्ले इंडियाचे शेअर्सही घसरणीसह व्यवहार करत आहेत.

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 61.5 अंकांनी किंवा 0.34 टक्क्यांनी घसरून 18,288.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात नकारात्मक होऊ शकते असे संकेत मिळाले. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 40 अंकांनी तर निफ्टी 18285 अंकांच्या खाली घसरला.

आज या कंपन्या तिमाही निकाल जाहीर करतील

Tata Motors, DLF, Vedanta, Cipla सारख्या कंपन्या आज त्यांचे तिमाही निकाल जाहीर करतील. या कंपन्यांच्या तिमाही निकालांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT