Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Opening: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह उघडला; आज 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

काल शेअर बाजारातील निकालांचा परिणाम आज त्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening 19 April 2023: शेअर बाजारात आज फारशी हालचाल दिसत नाही आणि शेअर बाजारात सपाट सुरुवात झाली. काल शेअर बाजारात आलेल्या काही निकालांचा परिणाम आज त्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे. सुरुवातीला निफ्टी आयटी शेअर्स घसरणीसह उघडले आणि बँक निफ्टीमध्येही घसरण दिसून आली.

बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स 60000 च्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टीही 17650 च्या खाली घसरला आहे. बाजाराच्या घसरणीत आयटी आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्सचा समावेश आहे.

निफ्टीमधील अपोलो हॉस्पिटल्सचा शेअर 1.25 टक्क्यांच्या सर्वाधिक घसरणीसह व्यवहार करत आहे. सिप्ला देखील घसरणीसह व्यवहार करत आहे. याआधी मंगळवारी सेन्सेक्स 183 अंकांनी घसरून 59,727 वर आणि निफ्टी 46 अंकांनी घसरून 17,660 वर बंद झाला.

BSE India

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती:

सेन्सेक्समधील 50 शेअर्सपैकी केवळ 9 शेअर्स आज वेगाने व्यवहार करत आहेत आणि 21 शेअर्समध्ये घसरण होत आहे. याशिवाय निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 15 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. त्याचवेळी 35 शेअर्समध्ये घसरणीसह व्यापार होताना दिसत आहे.

'या' शेअर्समध्ये तेजी :

बाजार उघडल्यानंतर लगेचच सेन्सेक्सच्या 13 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. यापैकी, प्रामुख्याने टाटा स्टील 1.53 टक्क्यांनी आणि M&M 0.56 टक्क्यांनी वाढले आहे.

भारती एअरटेल 0.55 टक्के, अॅक्सिस बँक 0.48 टक्के आणि टायटन 0.38 टक्के तेजीत आहेत. याशिवाय L&T, Powergrid, HDFC, HDFC बँक, रिलायन्स आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत.

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती:

वित्तीय सेवा, FMCG, IT, मीडिया, हेल्थकेअर आणि तेल आणि वायू निर्देशांकात घसरण होत आहे. आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक 0.7 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे आणि एफएमसीजी शेअर्स 0.46 टक्क्यांनी घसरले आहेत.

वाढत्या शेअर्समध्ये मेटल शेअर 1 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. ग्राहकोपयोगी वस्तू 0.57 टक्के आणि पीएसयू बँकेचे शेअर्स 0.48 टक्क्यांनी वधारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT