Share Market Sakal
Share Market

Share Market Opening: जागतिक संकेतांमुळे बाजार तेजीत; सेन्सेक्स 200 अंकांनी वाढला, रियल्टी आणि मेटल शेअर्समध्ये...

सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी केवळ 10 कंपन्यांच्या शेअसर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening 2 June 2023: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी वाढीसह झाली. आज बीएसई सेन्सेक्स 201.09 अंकांच्या किंवा 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 62,629.63 अंकांवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, NSE निफ्टी 57.40 अंकांच्या म्हणजेच 0.31 टक्क्यांच्या वाढीसह 18,545.15 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

हिरो मोटोकॉर्पचा शेअर निफ्टीवर 2.49 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे अदानी समूहाची कंपनी अदानी ट्रान्समिशनही दोन टक्क्यांहून अधिक वेगाने व्यवहार करत होती.

Share Market Opening 2 June 2023

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

सेन्सेक्समध्ये टेक महिंद्राचे शेअर्स 1.06 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते. याशिवाय अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 0.98 टक्के, टाटा स्टीलमध्ये 0.90 टक्के, आयसीआयसीआय बँकेत 0.82 टक्के, एचसीएल टेकमध्ये 0.74 टक्के हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.

यासह कोटक महिंद्रा बँक 0.61 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 0.57 टक्के, 50 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रात 0.52 टक्के, बजाज फायनान्समध्ये 0.52 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.52 टक्क्यांनी, एचडीएफसी बँक 0.49 टक्क्यांनी आणि अॅक्सिस बँक 0.52 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात इन्फोसिसचे शेअर्स 1.02 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे इंडसइंड बँक एशियन पेंट्स आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 63.5 अंकांच्या किंवा 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 18,627 अंकांवर व्यवहार करत होता. शुक्रवारी दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळत होते.

सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी केवळ 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. 20 कंपन्यांच्या शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. कोल इंडियाचा शेअर 4 टक्क्यांनी घसरला आहे. भारती एअरटेलही जवळपास 3 टक्क्यांनी घसरला आहे.

याआधी गुरुवारी देशांतर्गत बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण होती. सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या बाजारातील तेजी बुधवारी संपुष्टात आली. आठवड्याच्या सुरुवातीला देशांतर्गत बाजाराने पाच महिन्यांचा उच्चांक गाठला होता, त्यानंतर बाजारात नफावसुली सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT