Share Market Latest Updates Sakal
Share Market

Share Market Opening: कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात किंचीत घसरण, कोणत्या शेअर्सचे मोठे नुकसान?

Share Market Opening: आजच्या ट्रेडिंग सत्रात 1387 शेअर्सची खरेदी झाली, 699 शेअर्सची विक्री झाली

राहुल शेळके

Share Market Opening Latest Updates Today 28 July 2023: जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार सपाट उघडले. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांकात हलकी खरेदी दिसून आली.

मात्र, अल्पावधीतच सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांकात विक्री वाढली. सेन्सेक्स 136.55 अंकांनी म्हणजेच 0.21 टक्क्यांनी घसरला आणि निर्देशांक 66,130.27 च्या पातळीवर उघडला.

याशिवाय निफ्टी 50 निर्देशांकात 35.01 अंकांची किंवा 0.18 टक्क्यांची घसरण झाली आणि हा निर्देशांक 19,624.80 च्या पातळीवर उघडला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात 1387 शेअर्सची खरेदी झाली, 699 शेअर्सची विक्री झाली आणि 113 शेअर्सचे भाव अपरिवर्तित राहिले.

सेन्सेक्स आणि निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे आणि 17 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 25 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे आणि 25 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

सन फार्मा, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, टीसीएस, लार्सन अँड टुब्रो, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, कोटक महिंद्रा बँक, मारुती, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवरग्रीड, अॅक्सिस बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय हे आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सवर हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

आज सुरुवातीच्या व्यवहारात महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, बजाज फायनान्स आणि आयटीसीचे शेअर्समध्ये तेजीसह व्यवहार करत आहेत.

Share Market Opening Latest Updates Today 28 July 2023

'या' कंपन्यांचे तिमाही निकाल आज येणार

आज कंपन्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करत आहेत. दरम्यान, आयओसी, एसबीआय कार्ड, मॅरिको आणि महिंद्रा फायनान्ससह इतर कंपन्या एप्रिल-जून तिमाहीचे त्यांचे आर्थिक निकाल आज जाहीर करतील. यामुळे आज या शेअर्सची चर्चा होणार आहे.

आशियाई शेअर बाजारात नरमाई दिसून आली

बँक ऑफ जपानच्या धोरणात्मक बदलाच्या अपेक्षेने शुक्रवारी सुरुवातीच्या सत्रात आशियाई शेअर बाजारांमध्ये नरमाई दिसून आली. दुसरीकडे, येनमध्ये वाढ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT