Share Market Sakal
Share Market

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची स्थिर सुरुवात, आयटी शेअर्समध्ये घसरण सुरूच

जगभरातील आर्थिक मंदीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराने स्थिर सुरुवात केली.

राहुल शेळके

Share Market Opening 4 May 2023: जगभरातील आर्थिक मंदीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराने स्थिर सुरुवात केली. बदललेल्या परिस्थितीत, घसरणीचा ट्रेंड जगभरातील बाजारपेठांवर वर्चस्व गाजवत आहे आणि देशांतर्गत बाजारही यापासून वाचलेले नाहीत.

हेच कारण आहे की आज बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही प्रमुख देशांतर्गत निर्देशांकांची सुरुवात स्थिर झाली आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक स्थिर व्यवहार करत आहेत आणि निफ्टी निर्देशांक 18100 च्या आसपास व्यवहार करत आहेत. बीएसई सेन्सेक्स 61,258.13 च्या पातळीवर उघडला आणि निर्देशांकात 50 अंकांची किंचित वाढ दिसून येत आहे.

याशिवाय, निफ्टी निर्देशांकात किंचित वाढ झाली आहे आणि हा निर्देशांक 18100 च्या आसपास व्यवहार करत आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात 2,179 शेअर्समध्ये खरेदी आणि 1,314 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. याशिवाय 136 समभागांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

BSE India

मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही संमिश्र कल दिसून येत आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्स पैकी 14 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. सुरुवातीच्या व्यवहारात 16 कंपन्यांचे शेअर्स किंचित वाढले. आयटी शेअर्स आणि वित्तीय शेअर्समध्ये आजही घसरण पाहायला मिळत आहे. टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक, विप्रो सारखे आयटी शेअर्स सुरुवातीच्या व्यापारात घसरणीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

बीएसई सेन्सेक्सवर बजाज फायनान्सने सर्वाधिक 0.88 टक्क्यांची वाढ नोंदवली. त्याचप्रमाणे लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, टायटन, टीसीएस, एसबीआय, एनटीपीसी, सन फार्मा, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, एचडीएफसी, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा मोटर्सचे शेअर्स तेजीत होते.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्सवर, एचसीएल टेक, पॉवरग्रीड, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, आयटीसी, मारुती, विप्रो, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक आणि महिंद्रा आणि महिंद्रा शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

'या' कंपन्यांचे तिमाही निकाल आज येणार:

एचडीएफसी, अदानी एंटरप्रायझेस, डाबर, टाटा पॉवर, टीव्हीएस, हिरो यासह अनेक कंपन्यां गुरुवारी तिमाही निकाल जाहीर करतील.

शेअर बाजारात अस्वस्थता:

फेड रिझर्व्हने व्याजदरात आणखी वाढ केल्याने आणि अमेरिकेच्या दुसर्‍या बँकेवर दबाव येण्याच्या संकेतांमुळे गुरुवारी जागतिक शेअर बाजारात अस्वस्थता होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

G Ram Ji Bill: विरोधकांचा गोंधळ, घोषणाबाजी आणि कागदफाड... तरीही जी रामजी विधेयक लोकसभेत मंजूर; यात काय विशेष आहे?

Cameron Green: कॅमेरून ग्रीनच्या हाती TAX कापून किती रक्कम येणार? आधीच Welfare Fund मुळे ७.२० कोटी कापले जाणार...

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मारनच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Sangli Shaktipith : आधी इलेक्शन, मग नवे रेखांकन; शक्तिपीठ महामार्गावर सरकारची सावध पावले

Career Growth Astrology: मिथुन राशीसाठी 2026 ठरणार सुवर्णकाळ! गुरुच्या भ्रमणामुळे आयुष्यात लाभ अन् मोठी संधी

SCROLL FOR NEXT