Share Market Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार किंचित वाढीवर उघडला, सेन्सेक्समध्ये 100 अंकांची वाढ, 'या' शेअर्समध्ये तेजी

आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात किंचित वाढ झाली आहे.

राहुल शेळके

Share Market Opening 8 May 2023: आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात किंचित वाढ झाली आहे. नवीन ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी हळूहळू वर चढत आहेत. SGX निफ्टीमध्ये किंचित वाढ झाल्याचेही संकेत आहेत.

Share Market Opening

आजच्या व्यवहारात, बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 103.95 अंकांच्या किंवा 0.17 टक्क्यांच्या वाढीसह 61,158.24 च्या पातळीवर उघडण्यात यशस्वी झाला आहे.

दुसरीकडे, NSE चा निफ्टी 51.60 अंकांच्या म्हणजेच 0.29 टक्क्यांच्या वाढीसह 18,120.60 च्या पातळीवर उघडला.

आज एफएमसीजी शेअर्समध्ये प्रचंड वाढ होत आहे आणि मॅरिकोचा स्टॉक 8 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. याशिवाय एफएमसीजीमध्ये एकूण 0.70 टक्क्यांची वाढ दिसत आहे.

निफ्टीच्या रिअल्टी शेअर्समध्ये 1.10 टक्के वाढ झाली आहे. बँक निफ्टी 0.77 टक्क्यांनी आणि वित्तीय सेवा 0.74 टक्क्यांनी वर आहे.

सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत आणि केवळ 2 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 40 शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे आणि 10 शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे.

आज बाजारासाठी महत्त्वाचे ट्रिगर:

  • शुक्रवारी अमेरिकन बाजारात जोरदार वाढ झाली

  • कच्च्या तेलात 4% वाढ, सोन्या-चांदीच्या दरात घसरण

  • अदानी समूहाला एमएससीआयचा झटका

  • शनिवार व रविवार आणि आजच्या कंपन्यांचे निकालाचा बाजारावर परिणाम होईल

'या' शेअर्समध्ये तेजी:

इंडसइंड बँक 3.67 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे आणि M&M दीड टक्क्यांनी वधारला आहे. कोटक महिंद्रा बँक 1.46 टक्क्यांनी वर आहे. बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स दोन्ही 1.25 टक्क्यांच्या वर आहेत.

याशिवाय टाटा मोटर्स, एचडीएफसी, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड, एनटीपीसी, एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये तेजी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT