Share Market Closing latest updates today 24 march 2023 bse nse sensex nifty  Sakal
Share Market

Nifty Record: निफ्टीची नवी भरारी! निर्देशांकानं ओलांडला 20,000 अंशांचा टप्पा

आत्तापर्यंत दिला २० टक्के परतावा, कोणत्या स्टॉक्सनं जास्त रिटर्न दिला वाचा

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शेअर बाजारात आता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निर्देशांकानं अर्थात एनएसईनं नवं रेकॉर्ड प्रस्थापित केलं आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात सातत्यानं तेजीत सुरु असलेल्या या निर्देशांकानं सोमवारी २०,००० अंशांचा टप्पा पार केला. निफ्टीची विशेष बाब म्हणजे या निर्देशांकानं आपल्या २७ वर्षांच्या कारकीर्दीत गुंतवणुकदारांना २० टक्के परतावा दिला आहे. (Record Breaking Nifty Benchmark Index Soars to 20000)

एनएसईनं कोणत्या शेअर्सची केली चांदी

एनएसईत आत्तापर्यंत RIL, HDFC Bank, L&T आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या गुंतवणुकदारांवर चांगलाच धनवर्षाव केला. जाणून घ्या गेल्या वीस वर्षात जागतीक या निर्देशंकाचा प्रवास कसा राहिला? गेल्या २० वर्षात निफ्टीनं गुंतवणूकदारांना १४ टक्के परतावा दिला आहे.

दरम्यान, डाओ जोंस निर्देशांक १९९६ (५,५६५) तर आजचा स्तर ३४,५७७ इतका आहे. या काळात गुंतवणूकदारांना ६.२ टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला. त्यानंतर हैंगसेंगनं १९९६ (१०,९०९) तर २०२३ (१८,०६०) गुंतवणूकदारांना १.७ टक्के परतावा. तर निफ्टी १९९६ (१०००) २०२३ (२०,०००) यातील लिस्टेड कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल २० टक्के परतावा मिळाला आहे.

सुरुवातीला केवळ १२ शेअर्सनं सुरु झाली होती निफ्टी

  • RIL - 20 वर्षात ४५ पटींनी वाढ

  • HDFC Bank - 20 वर्षात ६१ पटींनी वाढ

  • ICICI Bank - 20 वर्षात ३४ पटींनी वाढ

  • HUL - 20 वर्षात १२ पटींनी वाढ

  • ITC - 20 वर्षात २९ पटींनी वाढ

  • SBI - 20 वर्षात १५ पटींनी वाढ

  • टाटा मोटर्स - 20 वर्षात ३१ पटींनी वाढ

  • टाटा स्टील - 20 वर्षात ११ पटींनी वाढ

  • L&T - 20 वर्षात ५८ पटींनी वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT