Share Market google
Share Market

Share Market Tips: या आयटी सर्व्हिस कंपनीने 60 हजारांचे केले 1 कोटी, अजुनही कमाई होण्याचा तज्ज्ञांना विश्वास...

सायएंटचे शेअर्स 19 जून 1998 रोजी केवळ 5.70 रुपयांना मिळत होते, जे आज 168 पटीने वाढून 957.95 रुपयांवर पोहोचले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : इंजिनीअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, डेटा ऍनालिटिक्स आणि नेटवर्कशी संबंधित असलेल्या सायएंटचे (Cyient) शेअर्स काही दिवसांपूर्वी एका वर्षाच्या उच्चांकावर होते. या वर्षी त्यात 17 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

या शेअर्सने गुंतवणुकदारांच्या अवघ्या 60 हजारांच्या गुंतवणुकीवर त्यांना कोट्यधीश बनवले आहे. येत्या काळात शेअर बाजार एक्सपर्ट्ससह ब्रोकरेज हाऊस या कंपनीकडे गुंतवणूकीची सुवर्ण संधी म्हणून पाहत आहेत. हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

त्याचे शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावरून सुमारे चार टक्क्यांच्या डिस्काऊंटवर मिळत आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आता या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास किमान 22 टक्के नफा होईल असे म्हटले आहे. सध्या त्याचे शेअर्स 957.95 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

रेल्वे, कन्सल्टिंग आणि युटिलिटी वगळता, त्याचे बाकी विभाग चांगले काम करत आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-डिसेंबर 2022 च्या पहिल्या 9 महिन्यांत 15 टक्के वाढ झाली आहे.

कंपनीचे बाकी विभागही आता रिकव्हरीच्या मार्गावर आहेत आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीच्या एकूण वाढीमध्ये त्यांचे चांगले योगदान अपेक्षित आहे. त्यामुळेच ब्रोकरेज हाऊसने त्यांना बाय रेटिंग कायम ठेवत 1170 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2022 रोजी त्याची किंमत 724 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर, 23 फेब्रुवारी 2023 रोजी तो चार महिन्यांत 37 टक्क्यांनी वाढून 995.05 रुपयांवर पोहोचला, जो एका वर्षातील उच्चांक आहे. सध्या या उच्चांकापासून तो 4% डिस्काऊंटवर मिळत आहे.

सायएंटचे शेअर्स 19 जून 1998 रोजी केवळ 5.70 रुपयांना मिळत होते, जे आज 168 पटीने वाढून 957.95 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजे त्या वेळी गुंतवलेले केवळ 60 हजारांच्या गुंतवणूकीवर गुंतवणुकदार कोट्यधीश झाले आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: सूर्यकुमार-शिवम दुबेही मुंबईसाठी खेळणार की नाही? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Latest Marathi News Live Update : विक्रोळी पार्कसाईट परिसरात गुरखा घालून फिरणाऱ्याला व्यक्तीला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले

Bangladesh Hindu Youth Murder Reason : बांगलादेशातील हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येमागचे खरे कारण अखेर आले समोर!

Mumbai: राज्यात दोनच विमानतळांना प्रेरणादायी नावे, पण कोणत्या? अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

SCROLL FOR NEXT