Share Market
Share Market  Sakal
Share Market

Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Share Market Tips : बुधवारी बाजारात शॉर्ट कव्हरिंग दिसून आले. बाजार खालच्या स्तरावरून चांगल्या रिकव्हरीसह बंद झाला. 24 जानेवारीनंतर निफ्टी पहिल्यांदाच 18000 च्या वर बंद झाला आहे.

बुधवारी सर्वाधिक खरेदी रियल्टी, आयटी आणि वाहन शेअर्समध्ये झाली. इन्फ्रा आणि मेटल इंडेक्सही वाढीसह बंद झाले. एफएमसीजी आणि फार्मा शेअर्स मात्र दबावाखाली राहिले. त्याच वेळी, 2 दिवसांच्या घसरणीनंतर, मिडकॅपमध्ये खरेदी झाली.

सेन्सेक्स 243 अंकांनी वाढून 61275 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 86 अंकांवर चढून 18016 वर बंद झाला. निफ्टी बँक 83 अंकांनी वाढून 41731 वर बंद झाला. त्याचवेळी मिडकॅप 189 अंकांनी वाढून 30671 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात बाजार थोडा अस्थिर राहिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. पण ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या भागात बाजारात तेजी दिसून आली.

जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे व्यापारी सावध असल्याचे दिसून येत आहे. बाजारातील हा ट्रेंड आणखी काही काळ सुरू राहू शकतो.

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

तांत्रिक दृष्टिकोनातून 17900 पार केल्यानंतर, बाजार 17850 च्या वर कायम आहे. बाजारासाठी हे सकारात्मक संकेत आहे. याशिवाय निफ्टीने इंट्राडे चार्टवर बुलिश कँडल आणि हायर बॉटम फॉर्मेशन केले आहे.

हे सध्याच्या पातळीपासून बाजारात आणखी चढ-उतार येण्याचे संकेत देत आहेत. ट्रेंड फॉलो करणाऱ्या ट्रेडर्सना आता 17900 वर सपोर्ट दिसत आहे. याच्या वर निफ्टी 18100-18150 पर्यंत जाताना दिसू शकतो. दुसरीकडे, निफ्टी 17,900 च्या खाली गेल्यास ही घसरण वाढू शकते.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)

  • ट्रेंट (TRENT)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT