Share Market Today Nifty below 22,100, Sensex drops over 100 pts auto shares decline  Sakal
Share Market

Share Market Opening: जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 72,600च्या जवळ, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Opening: जागतिक संकेतांचा परिणाम मंगळवारी शेअर बाजारावर दिसून आला. प्रमुख बाजार निर्देशांक सपाट उघडले. सेन्सेक्स 72700 आणि निफ्टी 22,100 च्या जवळ उघडला. बाजारात ऑटो, बँकिंगसह आयटी क्षेत्रात विक्री झाली.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 20 February 2024: जागतिक संकेतांचा परिणाम मंगळवारी शेअर बाजारावर दिसून आला. प्रमुख बाजार निर्देशांक सपाट उघडले. सेन्सेक्स 72700 आणि निफ्टी 22,100 च्या जवळ उघडला. बाजारात ऑटो, बँकिंगसह आयटी क्षेत्रात विक्री झाली.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 9 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 21 शेअर्स घसरत आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 20 शेअर्समध्ये वाढ तर 30 शेअर्समध्ये घसरत दिसून येत आहे.

शेअर बाजारात घसरण

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिड कॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात घसरण झाली, तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात वाढ झाली.

आज पॉवर ग्रिड, कोटक बँक, डॉ. रेड्डीज, हिंदाल्को, ओएनजीसी, यूपीएल आणि एलटीआय माइंडट्रीचे शेअर्स वधारले, तर कोल इंडिया, महिंद्रा, आयशर मोटर्स, एचडीएफसी लाईफ, बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह आणि मारुती सुझुकीचे शेअर्स घसरले.

अदानी समूहाच्या 10 शेअर्सपैकी 7 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते, तर NDTV, अदानी विल्मार आणि अदानी टोटलच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. मंगळवारी गिफ्ट निफ्टी पाच अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता. गिफ्ट निफ्टी 22175 अंकांच्या पातळीवर कार्यरत होता.

S&P BSE SENSEX

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

जागतिक संकेतांचा परिणाम शेअर बाजारावर होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आठवड्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचा निर्णय येणार आहे. त्यासोबतच ग्राहक किंमत निर्देशांकाशी संबंधित डेटा येणार आहे जो शेअर बाजाराची वाटचाल ठरवू शकतो.

झी एंटरटेनमेंटमध्ये 7% पेक्षा जास्त वाढ

झी एंटरटेनमेंटच्या शेअर्समध्ये मंगळवारी 7% पेक्षा जास्त वाढ होत आहे. सुरुवातीच्या व्यापारात शेअर 7.56% वाढून इंट्राडे उच्चांकावर (रु192) वर पोहोचला. झी-सोनी प्रकरणाशी संबंधित वकिलांमध्ये झालेल्या चर्चेच्या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे.

व्हर्लपूल शेअर्स 4.5% पेक्षा जास्त घसरले

व्हर्लपूल शेअर्समध्ये मंगळवारी 4.5% पेक्षा जास्त घसरण झाली. शेअर सुरुवातीच्या व्यापारात 4.77% घसरून रु. 1,268 च्या नीचांकी पातळीवर आला. ब्लॉक डीलद्वारे 24% स्टेक विकल्याच्या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT