Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात संमिश्र सुरुवात; निफ्टी 24,300च्या रेंजमध्ये, कोणत्य शेअर्समध्ये झाली वाढ?

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी (8 जुलै) संमिश्र सुरुवात झाली. सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांनी घसरला होता. त्याच वेळी, निफ्टी 24,300 च्या रेंजमध्ये व्यवहार करत होता. बँकिंग शेअर्सच्या घसरणीमुळे बँक निफ्टीही घसरला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 8 July 2024: देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी (8 जुलै) संमिश्र सुरुवात झाली. सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांनी घसरला होता. त्याच वेळी, निफ्टी 24,300 च्या रेंजमध्ये व्यवहार करत होता. बँकिंग शेअर्सच्या घसरणीमुळे बँक निफ्टीही घसरला. पण आज निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक प्रथमच 19,000 च्या पुढे गेला.

सेन्सेक्स 81 अंकांनी घसरला आणि 79,915 वर उघडला. निफ्टी 6 अंकांनी वाढून 24,329 वर उघडला. बँक निफ्टी 127 अंकांनी घसरून 52,533 वर उघडला. आयटी, फार्मा आणि एफएमसीजी शेअर्समध्ये वाढ झाली.

Share Market Opening

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स घसरत आहेत तर 14 शेअर्समध्ये वाढ होत आहे. वाढत्या शेअर्समध्ये टाटा मोटर्स 2.03 टक्क्यांनी आणि टेक महिंद्रा 0.52 टक्क्यांनी वाढले. SBI आणि ICICI बँक 0.34 टक्क्यांनी वधारले आहेत. M&M 0.33 टक्क्यांनी तर इन्फोसिस 0.25 टक्क्यांनी वर आहे.

Share Market Opening

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

निफ्टीच्या शेअर्सपैकी 30 शेअर्स घसरणीत आहेत आणि 19 शेअर्स तेजीत आहेत तर 1 शेअर कोणताही बदल न करता व्यवहार करत आहे. टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, विप्रो, एम अँड एम आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स टॉप गेनर्समध्ये आघाडीवर आहेत. घसरलेल्या शेअर्समध्ये टायटन, श्रीराम फायनान्स, डीव्हीच्या लॅब्स, अदानी पोर्ट्स आणि एशियन पेंट्सच्या शेअर्सचा समावेश आहे.

BSE SENSEX

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.51 लाख कोटींची वाढ

एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 5 जुलै 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 4,49,88,985.87 कोटी होते. आज म्हणजेच 8 जुलै 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,51,40,504.42 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,51,518.55 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

एका वर्षाच्या उच्चांकावर 200 शेअर्स

आज BSE वर 2934 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 2087 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 698 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 149 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 200 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 14 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 130 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 73 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar News: 'महाबळेश्वरमध्ये मध्यरात्री टपरीवर कारवाई'; आचारसंहितेचा फायदा घेत व्यावसायिकाचा प्रताप; प्रशासनाने डाव हाणून पाडला

Beed Heavy Rain: आता तरी आम्हाला मदत मिळणार का? शेतकऱ्यांचा केंद्रीय पथकाला सवाल, येवलवाडी परिसरात केली पाहणी

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामांना आचारसंहितेचा अडसर नाही! त्र्यंबकेश्वरमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण; आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

Pune News: 'काचळवाडीला जेरबंद बिबट्याचा सुटकेसाठी दोन बिबट्यांकडून प्रयत्न'; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Girish Mahajan : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण : "जागेचा मोबदला मिळेल," गिरीश महाजन यांचे आश्वासन; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे

SCROLL FOR NEXT