Share Market Today Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात विक्री सुरुच; सेन्सेक्स 454 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: शेअर बाजारात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी विक्री झाली. सेन्सेक्स 454 अंकांनी घसरून 72,488 वर बंद झाला. निफ्टीही 152 अंकांनी घसरून 21,995 वर आला. बाजारात सर्वात जास्त विक्री FMCG क्षेत्रात झाली

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 18 April 2024: शेअर बाजारात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी विक्री झाली. सेन्सेक्स 454 अंकांनी घसरून 72,488 वर बंद झाला. निफ्टीही 152 अंकांनी घसरून 21,995 वर आला. बाजारात सर्वात जास्त विक्री FMCG क्षेत्रात झाली, ज्यामध्ये नेस्ले इंडियाची सर्वात मोठी घसरण झाली. फार्मा आणि बँकिंग क्षेत्रातील तेजीलाही ब्रेक लागला.

Share Market Today

कोणते शेअर्स तेजीत?

गुरुवारी शेअर बाजारात तेजी होती पण शेवटच्या क्षणी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. शेअर बाजारात सर्वाधिक तेजीत भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, बजाज ऑटो, हिंदाल्को, एलटीआय माइंडट्री, एलएनटी आणि इन्फोसिस यांचा समावेश होता, तर अपोलो हॉस्पिटल, टायटन, ओएनजीसी, नेस्ले इंडिया, अदानी एंटरप्रायझेस, कोल इंडिया आणि ॲक्सिस बँक या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

Share Market Today

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

आजच्या व्यवहारात मीडिया क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सही घसरणीसह बंद झाले.

S&P BSE SENSEX

गुंतवणूकदारांचे 38,000 कोटींचे नुकसान

BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 18 एप्रिल रोजी 393.87 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच मंगळवारी 16 एप्रिल रोजी 394.25 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 38,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 38,000 कोटी रुपयांची घसरण झाली.

अदानी समूहाचे 9 शेअर्स घसरले

अदानी यांनी अंबुजा सिमेंटमध्ये एकूण 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ऑक्टोबर 2022 मध्ये एकूण 5,000 कोटी रुपये, मार्च 2024 मध्ये 6,660 कोटी रुपये, एप्रिल 2024 मध्ये 8,340 कोटी रुपये जमा झाले.

यानंतर, अंबुजा सिमेंट्समधील अदानी कुटुंबाची हिस्सेदारी 63.2% वरून 70.3% पर्यंत वाढली. अदानी समूहाच्या 10 शेअर्सपैकी 9 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले तर अदानी विल्मरचे शेअर्स तेजीसह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo Flight: ''खरं कारण काय ते आत्ता सांगता येणार नाही..'', इंडिगोने DGCA ला काय उत्तर दिलं?

IND vs SA, T20I: टीम इंडियाचे दोन तगडे शिलेदार तंदुरुस्त होऊन परतले; सूर्याच्या बातमीने द. आफ्रिकेचे धाबे दणाणले

Indian Army : ले. कर्नल हर्षवर्धन ढेकणे यांनी पुतीन यांना दिली मानवंदना; निमगाव म्हाळुंगीचा अभिमान!

SMAT 2025: ११ चेंडूंत ५४ धावा! अजिंक्य रहाणे सुसाट... T20तील शतकापासून थोडक्यात वचिंत राहिला; मुंबईला मात्र विजय मिळवून दिला

Latest Marathi News Update: कन्नडमध्ये ६२ वर्षीय वृद्धाने घेतला गळफास

SCROLL FOR NEXT