Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात पुन्हा घसरण; सेन्सेक्स-निफ्टी खाली; कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market Today: या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजारात विक्रमी वाढ झाली असली तरी गुरुवारी (27 जून) जागतिक बाजारातून घसरणीची चिन्हे आहेत. सकाळी गिफ्ट निफ्टीमध्ये 60 अंकांची घसरण झाली.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 27 June 2024: या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजारात विक्रमी वाढ झाली असली तरी गुरुवारी (27 जून) जागतिक बाजारातून घसरणीची चिन्हे आहेत. सकाळी गिफ्ट निफ्टीमध्ये 60 अंकांची घसरण झाली. अमेरिकन फ्युचर्स मार्केटही घसरणीसह व्यवहार करत होते.

दुसरीकडे, काल अमेरिकन बाजारांमध्ये रिकव्हरी दिसून आली. आज सकाळी जपानी बाजारातही घसरण दिसून आली. निक्की 400 अंकांनी घसरला होता. आज BSE सेन्सेक्स 115 अंकांनी घसरला आणि 78559 अंकांच्या पातळीवर उघडला तर निफ्टी 55 अंकांच्या घसरणीसह 23813 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

Share Market Today

PSU मध्ये कोणते शेअर्स तेजीत?

सुरुवातीच्या कामात PSU रेल्वे आणि संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. टिटागड रेल, SJVN, रेल विकास निगम, RailTel Corporation, IREDA, Indian Railway Finance Corporation, IRCON International, NMDC Limited, Tax Meco Rail, Bharat Dynamics, IRCTC, GAIL India, NHPC, गार्डन रीच शिप बिल्डर, कंटेनर कॉर्पोरेशन, NTPC आणि Bharat हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे ​​शेअर्स तेजीत होते.

तर हिंदुस्तान पेट्रोलियम, आरआयटीईएस लिमिटेड, ग्रेट इस्टर्न शिपिंग, कोचीन शिपयार्ड, कोल इंडिया, पॉवर ग्रिड आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे ​​शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

Share Market Today

गौतम अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती

सुरुवातीच्या व्यवहार गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते. कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, एशियन पेंट्स, लार्सन, ओएनजीसी, पॉवर ग्रिड, जेके पेपर, विप्रो, टीसीएस आणि एचसीएल टेक यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात होती.

BSE SENSEX

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 16 हजार कोटी रुपयांची घट

एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजेच 26 जून 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,37,18,681.93 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 27 जून 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,37,02,400.58 कोटी रुपयांवर आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 16,281.35 कोटी रुपयांची घट झाली आहे.

सेन्सेक्सचे 12 शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत त्यापैकी फक्त 12 ग्रीन झोनमध्ये आहेत. अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टीलमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, टेक महिंद्रा, एचसीएल आणि टीसीएसमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT