Share Market Today Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजाराच्या वाढीला लागला ब्रेक; सेन्सेक्स 790 अंकांनी घसरला, काय आहे कारण?

Share Market Today: शेअर बाजारातील विक्रमी वाढीला आज शुक्रवारी ब्रेक लागला. सेन्सेक्स जवळपास 800 अंकांनी घसरला आणि 74,250 च्या खाली बंद झाला. निफ्टीही जवळपास 250 अंकांनी घसरला. आज (12एप्रिल) बाजारात चौफेर विक्री झाली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 12 April 2024: शेअर बाजारातील विक्रमी वाढीला आज शुक्रवारी ब्रेक लागला. सेन्सेक्स जवळपास 800 अंकांनी घसरला आणि 74,250 च्या खाली बंद झाला. निफ्टीही जवळपास 250 अंकांनी घसरला. आज (12एप्रिल) बाजारात चौफेर विक्री झाली. फार्मा, सरकारी बँक, एफएमसीजी ही क्षेत्रे विक्रीत आघाडीवर आहेत.

Share Market Closing

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

शुक्रवारी शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये सुमारे एक टक्क्यांची घसरण झाली. निफ्टी फार्मा निर्देशांक 1.68 टक्क्यांनी घसरला. निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी बँकही एक टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing

शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये नेस्ले इंडिया आणि कोल इंडियाच्या शेअर्ससह Divi's Lab, Bajaj Auto, Tata Motors आणि TCS यांचा समावेश आहे. शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये सन फार्माचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले, तर मारुती आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स सुमारे 3 टक्क्यांनी घसरले. टायटन, ओएनजीसी, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअरमध्येही जोरदार विक्री झाली.

S&P BSE SENSEX

मार्केट कॅप 400 लाख कोटींच्या खाली

शेअर बाजारातील घसरणीमुळे शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली. बीएसईच्या आकडेवारीनुसार, एक्सचेंजवर सर्व शेअर्सचे मार्केट कॅप 400 लाख कोटी रुपयांच्या खाली घसरून 399.76 लाख कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 402.16 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 2.40 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

Share Market Closing

कोणते शेअर्स घसरले?

आजच्या व्यवहारात सन फार्मा 3.99 टक्क्यांनी, मारुती सुझुकी 3.28 टक्क्यांच्या घसरणीसह, पॉवर ग्रिड 2.58 टक्क्यांनी, टायटन 2.48 टक्क्यांनी, ओएनजीसी 2.32 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

शेअर बाजारातील घसरणीचे कारण काय?

भारतीय बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकन शेअर बाजार, जिथे गेल्या 4 दिवसांपासून घसरण सुरू आहे. अमेरिकेतील महागाईचे आकडेवारी जाहीर झाल्यानंतर, अमेरिकेच्या ट्रेझरी उत्पन्नात वाढ झाली, तर शेअर बाजारात घसरण झाली. तसेच कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारातही दबाव दिसून येत आहे.

देशांतर्गत बाजारातील नकारात्मक कल आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया सात पैशांनी घसरून 83.38 वर आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT