Share Market Today Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 900 अंकांनी खाली; निफ्टी 300 अंकांनी घसरला

Share Market Closing Today: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात खराब जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 25000 च्या खाली घसरला. आयटी आणि वाहन शेअर्समध्ये विक्री झाल्यामुळे बाजारात ही घसरण दिसून आली आहे.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 2 August 2024: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात खराब जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 25000 च्या खाली घसरला. आयटी आणि वाहन शेअर्समध्ये विक्री झाल्यामुळे बाजारात ही घसरण दिसून आली आहे.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सही मोठ्या प्रमाणात घसरण झाली. बाजार बंद झाल्यानंतर बीएसई सेन्सेक्स 886 अंकांनी घसरला आणि 81000 अंकांच्या खाली 80,982 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 311 अंकांच्या घसरणीसह 24,699.50 अंकांवर बंद झाला.

Share Market Closing

गुंतवणूकदारांचे 4.56 लाख कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 2 ऑगस्ट रोजी 457.06 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी 1 ऑगस्ट रोजी 461.62 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 4.56 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 4.56 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

Share Market Closing

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स तेजीत?

आज बीएसई सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी फक्त 5 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्येही एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर, सन फार्मा, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

BSE SENSEX

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्समधील उर्वरित 25 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये मारुती सुझुकीचे शेअर्स 4.94 टक्क्यांनी घसरले. याशिवाय टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) आणि टाटा स्टीलचे शेअर्स लाल रंगात बंद झाले.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज एकूण 4,033 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,718 शेअर्स वाढीसह बंद झाले. 2,197 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 118 शेअर्स कोणतेही चढ-उतार न होता फ्लॅट बंद झाले.

याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 264 शेअर्सनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 27 शेअर्सनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddhanath Temple : आटपाडीत सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील २४ किलो चांदी गायब, दुरुस्तीच्या नावाखाली धक्कादायक प्रकार

Bribery Action: साेलापुरात महावितरणचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; ऑनलाइन मंजुरीसाठी मागितले तीन हजार, जिल्ह्यात खळबळ!

कोर्टाच्या दणक्यानंतर धाबे दणाणले, शिंदेंसह अजितदादांचे पदाधिकारीही पोलिसांसमोर शरण; १३ जणांना अटक

Pune News: ४५ मिनिटांचा प्रवास आता ७ मिनिटांत! खंबाटकीच्या बोगद्याने प्रवासाला गती; जूनपासून वाहतूक सुरू होणार..

Nalasopara Crime : डोकं वरवंट्यानं ठेचलं, आईनेच १५ वर्षांच्या लेकीला संपवलं; काय घडलं?

SCROLL FOR NEXT