Share Market update  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. मात्र, दिवसभराच्या व्यवहारात बाजार सावरताना दिसत होता. सेन्सेक्स 45.46 अंकांनी घसरला तर निफ्टीही 130 पेक्षा जास्त अंकांनी वधारला. निफ्टी मिडकॅप 650 अंकांनी वाढला आहे.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 8 May 2024: शेअर बाजार आजही सपाट बंद झाला, पण बेंचमार्क निर्देशांक घसरणीतून सावरले. सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद झाले आणि बँक निफ्टी घसरला. BSE सेन्सेक्स 45 अंकांनी घसरून 73466 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 50 निर्देशांक कोणताही बदल न करता 22,302 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

Share Market Today

बुधवारी शेअर बाजारात बरेच चढ-उतार झाले. सकाळी घसरणीसह व्यवसाय सुरू केल्यानंतर, शेअर बाजार दिवसभर वाढीसह व्यवहार करत होता, परंतु पुन्हा एकदा घसरणीसह बंद झाला. Hero MotoCorpने गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर, Hero MotoCorpच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

कोणते शेअर्स तेजीत?

बुधवारी शेअर बाजाराच्या टॉप गेनर्सच्या यादीत बीपीसीएल, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, हिंडाल्को, पॉवर ग्रिड, कोल इंडिया आणि लार्सन या शेअर्सचा समावेश होता, तर टॉप लूजर्सच्या यादीत डॉ. रेड्डीज, एशियन पेंट्स, ग्रासिम इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्स आणि एसबीआय लाईफ यांचा समावेश होता.

शेअर बाजारातील चढ-उतारांदरम्यान पेटीएम, बर्जर पेंट्स, सिंजीन इंटरनॅशनल, दालमिया भारत आणि रॅमको सिमेंटचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत.

Share Market Today

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात ऑटो, एफएमसीजी, मेटल, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले, तर बँकिंग, आयटी, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनी आजच्या सत्रात 50 हजारांचा टप्पा पार केला आणि 361 अंकांच्या वाढीसह 50,036 अंकांवर बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक 94 अंकांच्या वाढीसह बंद झाला.

S&P BSE SENSEX

बीएसईचे मार्केट कॅप 400 लाख कोटींच्या पुढे

आजच्या व्यवहारातील तेजीमुळे, BSE वर कंपन्याचे बाजार भांडवल 400 लाख कोटी पार करून 400.85 लाख कोटींवर बंद झाले आहे. तर शेवटच्या ट्रेडिंग सत्रात मार्केट कॅप 398.43 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात मार्केट कॅपमध्ये 2.42 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बाजारात व्यवहार झालेल्या 3926 शेअर्सपैकी 2133 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 1661 शेअर्स घसरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Negative Energy Remedies: आजपासून चातुर्मास सुरू, रात्री करा 'हे' चमत्कारिक उपाय, नकारात्मकता राहील दूर

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

SCROLL FOR NEXT