Share Market Opening Skala
Share Market

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची वाढीसह सुरुवात; कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Opening: जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात किंचित वाढीसह झाली. बाजारात आयटी, मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये खरेदी होत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 12 February 2024: जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात किंचित वाढीसह झाली. बाजारात आयटी, मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये खरेदी होत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 144 अंकांनी तर निफ्टी 37 अंकांनी वाढला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी निर्देशांकात वाढ झाली तर निफ्टी बँक निर्देशांकात घसरण झाली.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात डॉ. रेड्डीज, विप्रो, यूपीएल, डिवीज लॅब, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स वधारत होते, तर हिरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, पॉवर ग्रिड, कोल इंडिया, एसबीआय यांचे शेअर्स घसरले.

Share Market Opening

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, अदानी समूहाच्या 10 शेअर्सपैकी 9 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होत होती आणि अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर घसरला.

कोणते शेअर्स वाढले?

शेअर बाजारातील तेजीच्या काळात सर्वोटेक पॉवर सिस्टीम, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, पेटीएम, गल्फ ऑइल, पंजाब नॅशनल बँक, स्पाइसजेट, बीसीएल इंडस्ट्रीज आणि साऊथ इंडियन बँकेच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

S&P BSE SENSEX

सोमवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात आयटीसी, केम बाँड केमिकल्स, बंधन बँक, इंडियन ऑइल, कजारिया सिरॅमिक्स, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स आणि आयआरईडीएच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

जागतिक बाजारात संमिश्र कल

जागतिक बाजारांमध्ये संमिश्र कल पाहायला मिळत आहे. शुक्रवारी यूएस मार्केटमध्ये डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज 0.14 टक्क्यांनी घसरले होते, तर S&P 500 0.57 टक्क्यांनी आणि Nasdaq 1.25 टक्क्यांनी वर होते. S&P 500 ने इतिहासात प्रथमच 5000चा टप्पा ओलांडण्यात यश मिळवले.

बहुतांश आशियाई बाजार बंद

आशियाई बाजारात आज संमिश्र वातावरण आहे. जपानचा निक्केई सकाळी 0.1 टक्क्यांनी वर होता, तर टॉपिक्स 0.20 टक्क्यांनी खाली होता. चीनी नववर्षानिमित्त आज हाँगकाँगच्या हँग सेंग आणि चीनच्या शांघाय कंपोझिटमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. आज सोमवारी मलेशिया, सिंगापूर, तैवान आणि दक्षिण कोरियामध्येही शेअर बाजार बंद आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

किल्लारीचा प्रवास: १९९३च्या महाभूकंपातून भेगाळलेल्या जमिनीवर उभी राहिली भविष्याची स्वप्ने

SCROLL FOR NEXT