Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची किंचित घसरणीसह सुरुवात; बँक निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स वधारले?

Sensex-Nifty Today: शेअर बाजारात आज सलग पाचव्या दिवशी घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले. बँक निफ्टी रिकव्हरीसह उघडला. सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांनी घसरला आणि 73,300 च्या वर उघडला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 9 May 2024 (Marathi News): शेअर बाजारात आज सलग पाचव्या दिवशी घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले. बँक निफ्टी रिकव्हरीसह उघडला. सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांनी घसरला आणि 73,300 च्या वर उघडला.

निफ्टीमध्ये सुमारे 20 अंकांची थोडीशी घसरण झाली आणि निर्देशांक 22,280 च्या आसपास उघडला. बँक निफ्टी 200 अंकांच्या वाढीसह 48,200च्या वर उघडला. आज सकाळी गिफ्ट निफ्टीमध्ये थोडीशी घसरण झाली. तो 5.85 अंकांनी 22,383 च्या आसपास व्यवहार करत होता.

Sensex Today

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्समध्ये वाढ आणि 17 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. M&Mचा शेअर सर्वात जास्त तेजीत आहे आणि 2.68 टक्क्यांनी वाढला आहे. टाटा मोटर्स 1.40 टक्क्यांनी तर मारुती 1.31 टक्क्यांनी वधारत आहे. टायटन 1.22 टक्के आणि एचसीएल टेक सुमारे एक टक्क्यांनी वर आहे.

Nifty Today

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी फार्मा, निफ्टी आयटी आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात घसरण झाली. तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात वाढ दर्शविणाऱ्या कंपन्यांमध्ये बजाज ऑटो, एचसीएल टेक, हीरो मोटोकॉर्प, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, एसबीआय आणि कोटक बँक यांचे शेअर्स होते. घसरण झालेल्या शेअर्समध्ये टाटा कंझ्युमरचे शेअर्स, टेक महिंद्रा, बीपीसीएल, एशियन पेंट्स, आयशर मोटर्स आणि एचडीएफसी लाईफ यांचा समावेश होता.

S&P BSE SENSEX

NSEच्या शेअर्सची स्थिती?

NSEच्या 50 शेअर्सपैकी 16 शेअर्समध्ये वाढ होत आहे तर 33 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. Hero MotoCorp चे शेअर्स 5.80 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक वधारताना दिसत आहेत. M&M मध्ये 3.06 टक्के वाढ झाली आहे, बजाज ऑटो, आयशर मोटर्स, टायटनच्या शेअर्समध्येही सर्वाधिक वाढ झाली आहे.

जागतिक बाजारात काय स्थिती?

जपानचा निक्केई किरकोळ 0.26 टक्क्यांनी वाढला, तर कोरियाचा कोस्पी 0.40 टक्क्यांनी घसरला. याउलट, ऑस्ट्रेलियाचा ASX200 0.55 टक्क्यांहून अधिक घसरला.

यूएस मध्ये, S&P 500 फ्लॅट होता, तर Nasdaq Composite 0.18 टक्क्यांनी घसरला. डाऊ जोन्स 172 अंक किंवा 0.44 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे.

देशांतर्गत बाजारात, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) 6,669.10 कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) 8 मे रोजी 5,928.81 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT