Share Market Updates Sensex, Nifty down at opening bell, Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घायाळ; सेन्सेक्स 500 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Sensex-Nifty Today: मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्री दिसून आली. जागतिक संकेतांचा प्रभाव बाजारावर दिसून येत आहे. सकाळी सेन्सेक्स सुमारे 500 अंकांनी घसरला आणि 72,900 च्या खाली आला. निफ्टीही 150 अंकांनी घसरून 22,100 वर आला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 16 April 2024 (Marathi News):

मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्री दिसून आली. जागतिक संकेतांचा प्रभाव बाजारावर दिसून येत आहे. सकाळी सेन्सेक्स सुमारे 500 अंकांनी घसरला आणि 72,900 च्या खाली आला. निफ्टीही 150 अंकांनी घसरून 22,100 वर आला. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात सुधारणा दिसून येत आहे. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले होते.

Sensex Today

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 7 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे आणि 23 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. वाढत्या शेअर्समध्ये, टाटा स्टील सर्वाधिक तेजीत आहे आणि त्यासोबतच मारुती सुझुकी, टायटन, M&M, नेस्ले आणि JSW स्टीलचे शेअर्स वधारत आहेत.

Nifty Today

घसरलेल्या शेअर्समध्ये इंडसइंड बँक 1.48 टक्के, बजाज फायनान्स 1.26 टक्क्यांनी खाली आहे. इन्फोसिस 1.25 टक्के आणि बजाज फिनसर्व्ह 1.07 टक्क्यांनी घसरला आहे. कोटक महिंद्रा बँक 1.06 टक्क्यांनी घसरला आहे आणि ICICI बँक 0.95 टक्क्यांनी घसरला आहे.

NSE निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

NSE निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 22 शेअर्समध्ये वाढ होत आहे आणि 28 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. ओएनजीसी टॉप गेनर आहे आणि 1.43 टक्क्यांनी वाढला आहे. यासह आयशर मोटर्स, मारुती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे.

S&P BSE SENSEX

बीएसईचे मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये घसरण

बीएसईचे मार्केट कॅप 394.44 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. BSE वर 2781 शेअर्समध्ये व्यवहार होत आहेत आणि 1779 शेअर्समध्ये वाढ होत आहे. आज 907 शेअर्सची घसरण सुरू आहे आणि 95 शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय व्यवहार करत आहेत. 84 शेअर्सवर अप्पर सर्किट तर 41 शेअर्सवर लोअर सर्किट लागू करण्यात आले आहे.

पश्चिम आशियातील वाढता तणाव पाहून गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे पाहत आहेत. यामुळे 10 वर्षांच्या अमेरिकन बाँडचे उत्पन्न 4.6 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सोन्याचा भावही 0.6 टक्क्यांनी वाढून 2,358 डॉलर प्रति औंस झाला. मध्य आशियातील तणावाचा परिणाम आशियाई चलनांवरही दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपया 83.5 वर घसरला.

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी आज 3,268 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आणि देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी सुमारे 4,800 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

शेअर बाजारातील तज्ञांचे मत

नवीन कुलकर्णी, ॲक्सिस सिक्युरिटीज पीएमएसचे मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणाले, “पाश्चात्य देशांमधील भू-राजकीय तणाव आणि चलनवाढीच्या चिंतेमुळे जगभरातील शेअर बाजारांवर दबाव वाढला आहे.

भारत त्यांच्यापेक्षा चांगल्या स्थितीत असला तरी कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती हा मोठा अडथळा आहे. जागतिक बाजारातील परिस्थितीनुसार गुंतवणूकदारांनी घसरणीचा फायदा घेऊन गुंतवणूक करून चांगले शेअर्स खरेदी करावेत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT