Sensex-Nifty Today Sakal
Share Market

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Sensex-Nifty Today: देशांतर्गत शेअर बाजारात आज गुरुवारी चढउतार पाहायला मिळत आहेत. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले. जागतिक बाजारातून येणारे नकारात्मक संकेत बाजारावर वर्चस्व गाजवताना दिसले. ऊर्जा आणि तेल शेअर्समध्ये वाढ दिसून आली

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 2 May 2024 (Marathi News): देशांतर्गत शेअर बाजारात आज गुरुवारी चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले. जागतिक बाजारातून येणारे नकारात्मक संकेत बाजारावर वर्चस्व गाजवताना दिसले. ऊर्जा आणि तेल शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

Sensex Today

दुसरीकडे, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. सलग सातव्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, अमेरिकन वायदे बाजारात घसरण दिसून आली. अमेरिकन फ्युचर्स मार्केट आणि गिफ्ट निफ्टीही सुस्त दिसले.

कोणते शेअर्स तेजीत?

आज BSEचा सेन्सेक्स 133.36 अंकांनी किंवा 0.18 टक्क्यांनी वाढून 74,616 वर आणि NSEचा निफ्टी 47.15 अंकांनी किंवा 0.21 टक्क्यांनी वाढून 22,652 वर पोहोचला आहे. गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बीपीसीएल, हीरो मोटोकॉर्प, महिंद्रा, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, अदानी एंटरप्रायझेस आणि कोल इंडियाचे शेअर्स वधारले.

Nifty Today

तर कोटक बँक, हिंदाल्को, मारुती सुझुकी, डिव्हीज लॅब्स, भारती एअरटेल, विप्रो आणि इन्फोसिसचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. या सोबत निफ्टी आयटी निर्देशांक किंचित वाढीसह व्यवहार करत होते तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात वाढ होत होती.

S&P BSE SENSEX

निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारात तेजी येऊ शकते, असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. निफ्टीसाठी, 22,800च्या स्तरावर रेझिस्टन्स दिसतो तर 22,000च्या पातळीवर सपोर्ट दिसत आहे. शेअर बाजारात व्यापार करायचा असेल तर कोल इंडिया, ग्रासिम, इंडसइंड बँक यासारखे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. गुरुवारी शेअर बाजारातील व्यवहार सकारात्मक सुरू होऊ शकतात, असे गिफ्ट निफ्टीकडून संकेत मिळाले होते.

बीएसईचे मार्केट कॅप 407.80 लाख कोटी रुपयांवर

बीएसईचे मार्केट कॅप 407.80 लाख कोटी रुपयांवर आले आहे. जे तेजीच्या काळात 408 लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक शिखरावर पोहोचले होते. सकाळी 9.35 वाजता बीएसईवर 2986 शेअर्समध्ये व्यवहार होताना दिसत आहे.

त्यापैकी 1810 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. 1051 शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर 125 शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार होत आहेत. 114 शेअर्सवर अप्पर सर्किट तर 38 शेअर्सवर लोअर सर्किट लागू करण्यात आले आहे. 135 शेअर्समध्ये 52 आठवड्यांचा उच्चांक दिसून येत आहे आणि 8 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Report Card: भारतीय संघांनी वर्षभरात जिंकल्या तीन ICC ट्रॉफी; वनडे-टी२०मध्ये वर्चस्व, पण कसोटीत घोर निराशा

Vasai Virar News : नवं वर्ष जल्लोषाला यंदा तळीरामाची पंचाईत होणार; एकादशी मुळे बार बंद!

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीसाठी पुण्याची जबाबदारी असणार सुप्रिया सुळेंकडे!

Loni Kalbhor News : अवघ्या अर्ध्या तासात ५ एकर ऊस जळून खाक; लोणी काळभोरचे ६ शेतकऱ्यांचे १० लाखांपेक्षा अधिक नुकसान!

Mangalwedha Election : मंगळवेढा नगरपालिकेत क्रॉस मतदानाचा परिणाम; सुप्रिया जगतापचा पराभव; सुनंदा अवताडेला फायदा!

SCROLL FOR NEXT