Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; मिडकॅप निर्देशांक उच्चांकावर, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: देशांतर्गत बाजाराने बुधवारी (22 मे) थोड्या वाढीसह व्यवहाराला सुरूवात केली. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह उघडला. सेन्सेक्स 212 अंकांनी वाढला आणि 74,165 पातळीवर उघडला. निफ्टी 47 अंकांनी वाढून 22,576 आणि निफ्टी बँक 47,900वर उघडला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 22 May 2024: देशांतर्गत बाजाराने बुधवारी (22 मे) वाढीसह व्यवहाराला सुरूवात केली. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह उघडले. सेन्सेक्स 212 अंकांनी वाढला आणि 74,165 पातळीवर उघडला. निफ्टी 47 अंकांनी वाढून 22,576 आणि निफ्टी बँक 47,900 पातळीवर उघडला.

Share Market Today

अमेरिका आणि ब्रिटनमधील व्याजदरातील बदलांवर जगभरातील व्यापारी आणि गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत. रिझर्व्ह बँकेने चलनवाढीची ताजी आकडेवारी जाहीर केल्यानंतर, व्याजदर शिथिल करण्याच्या बाबतीत रिझर्व्ह बँक अद्याप स्पष्ट नसल्याचे दिसते. कच्च्या तेलाच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवण्यात आली आहे.

Share Market Today

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स घसरले आहेत तर 15 शेअर्समध्ये वाढ होत आहे. एचयूएल, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले, आयटीसी, इन्फोसिस आणि इतर काही मोठ्या शेअर्समध्ये वाढीसह व्यवहार होत आहेत. घसरणाऱ्या शेअर्समध्ये पॉवर ग्रिड सर्वाधिक 1.55 टक्क्यांनी घसरला आहे. तर SBI 1.40 टक्क्यांनी घसरला आहे. सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, ॲक्सिस बँक या शेअर्समध्येही घसरण दिसून येत आहे.

S&P BSE SENSEX

बीएसईचे बाजार मार्केट कॅप पातळीवर

बीएसईचे मार्केट कॅप प्रथमच 416.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे आणि ही त्याची विक्रमी पातळी आहे. कालच्या व्यवहारात बीएसईचे मार्केट कॅप 414 लाख कोटी रुपये झाले होते. आज बीएसईमध्ये 3163 शेअर्समध्ये ट्रेड होताना दिसत आहे आणि यापैकी 1333 शेअर्स तेजीत आहेत. 1709 शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर 121 शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार होत आहेत.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.60 लाख कोटींची वाढ

एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 21 मे 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,14,62,306.56 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 22 मे 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,16,23,236.26 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1,60,929.7 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: मोठी बातमी! बिहार विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला?

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Latest Marathi News Live Update: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांसोबत बाचाबाची

SCROLL FOR NEXT