Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Sensex-Nifty Today: आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे. बँक निफ्टी पुन्हा नव्या विक्रमी पातळीवर उघडला आहे. निफ्टी आज 22,679 वर उघडला. तर सेन्सेक्स 74,700च्या वर उघडला. निफ्टी बँक 49,500 च्या वरची पातळी गाठताना दिसला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 30 April 2024 (Marathi News): आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे. बँक निफ्टी पुन्हा नव्या विक्रमी पातळीवर उघडला आहे. निफ्टी आज 22,679 वर उघडला. तर सेन्सेक्स 74,700च्या वर उघडला. निफ्टी बँक 49,500च्या वरची पातळी गाठताना दिसला.

Sensex Today

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटी निर्देशांकात किंचित घसरण झाली आहे तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात सर्वाधिक वाढ झालेल्या शेअर्समध्ये महिंद्रा, आयशर मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, एचडीएफसी लाइफ, बजाज ऑटो आणि कोल इंडिया लिमिटेडचे ​​शेअर्स होते. तर घसरण झालेल्यांमध्ये टायटन, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डीज, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा आणि ब्रिटानियाचे शेअर्स यांचा समावेश होता.

Nifty Today

मल्टीबॅगर शेअर्सची स्थिती

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये बीएसई लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक, एचसीएल टेक, विप्रो, कोटक महिंद्रा बँक, ओएनजीसी आणि लार्सन यांचे शेअर्स वाढले होते.

S&P BSE SENSEX

तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स या कंपन्यांचे शेअर्स किंचित घसरणीसह व्यवहार करत होते. अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते. अदानी विल्मार लिमिटेडमध्ये एक टक्का वाढ झाली तर अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली.

मिडकॅप निर्देशांक पुन्हा विक्रमी उच्चांकावर

देशांतर्गत बाजार उघडल्यानंतर, मिडकॅप निर्देशांकाने पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला आहे आणि बँक निफ्टीच्या बरोबरीने व्यवहार करत आहे. स्मॉलकॅप निर्देशांकही वेगाने वाढत आहे. आज ऑटो इंडेक्समध्ये मोठी वाढ झाली आहे. मारुती सुझुकीच्या वाढीचा त्यात मोठा वाटा आहे.

बीएसईचे बाजार भांडवल आज 408.17 लाख कोटी रुपयांवर

बीएसईचे बाजार भांडवल आज 408.17 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे आणि त्यात सतत वाढ होत आहे. सध्या बीएसईवर 2910 शेअर्समध्ये व्यवहार होताना दिसत आहे, तर 1996 शेअर्समध्ये वाढ होत आहे. 806 शेअर्समध्ये घसरण झाली असून 108 शेअर्समध्ये ट्रेडिंग कायम आहे.

आज 116 शेअर्सवर अप्पर सर्किट लागू करण्यात आले आहे आणि 43 शेअर्स लोअर सर्किटसह राहिले आहेत. 132 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर आणि 12 शेअर्स त्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

Shocking! माथेफिरू तरुणाने चाव्या हिसकावल्या, प्रवाशांनी भरलेली बस सुरू केली अन्...; अनेकांना चिरडले

Latest Maharashtra News Updates : विसर्जन मार्गात खड्ड्यांचे विघ्न, पोलिसांनीच हाती फावडे घेत केलं कौटोकास्पद काम!

SCROLL FOR NEXT