shares of chemical company Pidilite Industries are predicted to rise share market tips  
Share Market

Share Market : अनेक गुंतवणूकदार बनले कोट्यधीश! पुन्हा 'या' केमिकल कंपनीच्या शेअर्समध्ये तेजीचे संकेत

सकाळ डिजिटल टीम

पिडीलाइट इंडस्ट्रीजच्या (Pidilite Industries) शेअर्सने त्यांच्या गुंतवणुकदारांना कायमच चांगला नफा दिला आहे. पण फक्त यावर्षीचा विचार केल्यास हे शेअर्स जवळपास 7 टक्क्यांनी घसरलेत. पण लाँग टर्ममध्ये या शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

या कंपनीवर बाजारातील तज्ज्ञांचा अजूनही विश्वास आहे. या शेअर्समध्ये येत्या काळात 21 टक्के तेजी येऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचे शेअर्स सध्या बीएसईवर 2353.20 रुपयांवर ट्रे़ड करत आहेत.

पिडिलाइटचे मार्जिन येत्या तिमाहीत सुधारेल असा विश्वास देशांतर्गत ब्रोकरेज नोवुमा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने वर्तवला आहे. कारण ही कंपनी अशा सेगमेंटमध्ये आहे जिथे स्पर्धा कमी आणि नव्याने प्रवेश करणाऱ्या कंपन्यांसाठी एन्ट्री कठीण आहे. अशात इनपुट खर्चात घट, कंस्ट्रक्शन ऍक्टीव्हिटीजमध्ये वाढ आणि कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवण्याचा सरकारचा दबाव यामुळे पिडीलाइटच्या व्यवसायाला चांगला सपोर्ट मिळेल.

हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

कंपनीची मार्केटमधील डॉमिनंट पोझिशन, 40 लाखांहून अधिक आउटलेट्सपर्यंत पोहोच शिवाय तसेच मध्यस्थ आणि ग्राहक यांच्याशी मजबूत संबंध, यामुळे कंपनीला फायदा होईल. अशा स्थितीत ब्रोकरेजने याला बाय रेटिंग दिले असून त्यात गुंतवणुकीसाठी 2855 रुपयांचे टारगेट दिले आहे.

18 मार्च 2005 रोजी पिडीलाइटच्या शेअर्सची किंमत 21.79 रुपये होती. जी आता 2353.20 रुपयांवर गेली आहे. याचा अर्थ 2005 मध्ये एखाद्याने यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते 18 वर्षांत 108 पटीने वाढून 1.08 कोटीवर पोहोचली असती.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT