Share Market Sakal
Share Market

Small Cap Stock: 75 पैशांच्या शेअरची कमाल, 20 वर्षांत गुंतवणूकदार बनले कोट्याधीश, आणखी तेजीचा तज्ज्ञांना विश्वास

ब्रोकरेजच्या मते या शेअर्समध्ये येत्या काळात आणखी तेजी दिसून येणार आहे.

शिल्पा गुजर

Small Cap Stock: स्मार्ट ग्रीड, गॅस आणि इलेक्ट्रिसिटी यासारखी मिटरिंग सर्व्हिस देणारी कंपनी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्सच्या (Genus Power Infrastructures) शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न दिला आहे.

या महिन्यात त्याने 29 टक्के परतावा दिला आहे. तर मागच्या 11 महिन्यांत हा शेअर 148 टक्क्यांनी वाढून विक्रमी उच्चांक गाठला आहे. लाँग टर्मचा विचार केल्यास अवघ्या 46 हजारांच्या गुंतवणुकीवर या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

ब्रोकरेजच्या मते या शेअर्समध्ये येत्या काळात आणखी तेजी दिसून येणार आहे. आताच्या किंमतीपासून किमान 13 टक्क्यांनी हा शेअर वाढू शकतो असा त्यांचा अंदाज आहे. त्याचे शेअर्स सध्या बीएसईवर 163.75 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

18 जुलै 2003 रोजी जीनस पॉवरचे शेअर्स फक्त 75 पैशांना मिळत होते. आता हा शेअर तब्बल 163.75 रुपयांवर गेला आहे, म्हणजेच 20 वर्षांत केवळ 46 हजारांच्या गुंतवणुकीवर त्याने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

गेल्या वर्षी 8 ऑगस्ट 2022 रोजी त्याची किंमत 72.55 रुपये होती, जी एका वर्षातील नीचांकी आहे. यानंतर, 6 जुलै 2023 रोजी गेल्या आठवड्यात तो केवळ 11 महिन्यांत सुमारे 148 टक्क्यांनी वाढून 179.80 रुपयांवर पोहोचला, हा त्याचा विक्रमी उच्चांक आहे.

पण यानंतर प्रॉफिट-बुकींगमुळे हा शेअर खाली आला, सध्या हा शेअर त्याच्या उच्चांकापासून सुमारे 9 टक्के सूटीवर मिळत आहे.

जीनस पॉवरने 15 टक्के हिस्सेदारीच्या बदल्यात 520 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एसपीव्ही अर्थात स्पेशल पर्पज व्हेहिकल सेटअप करण्यासाठी जीआयसीसोबत करार केला आहे.

यामध्ये, जीआयसी 74 टक्के आणि जीनसचे 26 टक्के असतील. यासह, जीनस सुमारे 30 हजार कोटीच्या स्मार्ट मीटरसाठी बोली लावू शकणार आहे.

जीनसला चिपच्या पुरवठ्यातील अडचणी आणि कमी किंमतींचा फायदा होईल असा अंदाज देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने वर्तवला आहे.

मजबूत ऑर्डर बॅकलॉग आणि जलद अंमलबजावणीमुळे सीएजीआर वाढीचा ब्रोकरेजचा अंदाज आहे. या सर्व कारणांमुळे ब्रोकरेजने जीनसला 185 रुपयांच्या टारगेटसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT