Share Market Updates Sensex, Nifty down 1 percent Sakal
Share Market

Stock Market Crash: शेअर बाजारात पुन्हा त्सुनामी; सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, 'या' शेअर्समुळे बुडाले पैसे

Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारात आज जोरदार विक्री सुरू आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही एक टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. सेबी प्रमुखांच्या विधानानंतर बाजारातील घसरण सतत वाढत आहे

राहुल शेळके

Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारात आज जोरदार विक्री सुरू आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही एक टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. सेबी प्रमुखांच्या विधानानंतर बाजारातील घसरण सतत वाढत आहे.

ज्यात त्यांनी स्मॉलकॅप आणि मिडकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये फेरफार होण्याची शक्यता व्यक्त केली होती. आज सकाळी बाजार वाढीसह उघडले पण थोड्याच वेळात निफ्टी आणि सेन्सेक्सने सर्व नफा गमावला. सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात, FMCG क्षेत्र वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टी मेटल, ऑटो, पीएसयू बँक, फार्मा, रियल्टी, एनर्जी आणि इन्फ्रा यासह सर्वच क्षेत्रांमध्ये जोरदार विक्री होत आहे.

या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली

अदानी एंटरप्रायझेस, पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी आणि कोल इंडियाचे शेअर्स आज 5 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. त्याच वेळी, या घसरणीदरम्यान, ITC स्टॉक 5 टक्क्यांहून अधिक वाढत आहे. कोटक बँक, आयसीआयसी बँक, बजाज फायनान्सचे शेअर्स वधारताना दिसत आहेत.

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्ही.के.विजयकुमार म्हणाले, मिड आणि स्मॉलकॅप सेगमेंटमधील उच्च मूल्यांकन हा अनेक महिन्यांपासून चिंतेचा विषय आहे. सकाळपासून स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये घसरण होती पण जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसे लार्ज कॅप शेअर्सवरही घसरणीचा प्रभाव झाला.

बाजारातील घसरणीचे प्रमुख कारण

आज प्रॉफिट बुकींगमुळे घसरण झाली आहे. या घसरणीत मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सचा सर्वात मोठा वाटा आहे. काही दिवसांपासून हा ट्रेंड दिसून येत आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये 3 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

अदानी समूहाचे एका दिवसात 90,000 कोटींचे नुकसान

आज अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. शेअर बाजारातील घसरणी दरम्यान, अदानी समूहाचे शेअर्स आज सुमारे 13 टक्क्यांनी घसरले. समूहातील सर्व 10 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. त्यामुळे दुपारपर्यंत अदानी समूहाचे बाजारमूल्य सुमारे 90 हजार कोटी रुपयांनी कमी झाले होते.

सर्वात मोठी घसरण अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये दिसून आली, हा शेअर इंट्राडे 13 टक्क्यांनी घसरून 1,650 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. 2024 मध्ये अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समधील ही सर्वात मोठी इंट्राडे घसरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

Pregnancy Job Scam : महिलांना गरोदर करा आणि कमवा 10 लाख! 'प्रेग्नंट जॉब सर्विस'च्या नावाखाली मोठा घोटाळा उघड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT