Share Market Crash News Sakal
Share Market

Stock Market Crash: शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 1,000 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले

Stock Market Crash: सेन्सेक्समध्ये आज 1,000 अंकांची घसरण झाली आहे,

राहुल शेळके

Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स-निफ्टी प्रचंड घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्समध्ये आज 1,000 अंकांची घसरण झाली आहे, तर निफ्टीमध्येही 300 अंकांची घसरण झाली आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक आज 1.5 टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत. गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत असून एकूण बाजार भांडवलापैकी 5 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

बाजाराची स्थिती कशी आहे - किती घसरण आहे?

शेअर बाजारात आज चौफेर घसरण दिसत आहे. BSE सेन्सेक्स 1,013.22 अंकांनी किंवा 1.52 टक्क्यांनी घसरून 65,446.09 च्या पातळीवर आला. त्याच वेळी, NSE चा निफ्टी 300.60 अंक किंवा 1.52 टक्क्यांच्या घसरणीसह 19,432.95 च्या पातळीवर आला आहे.

बँक निफ्टीतही घसरण झाली

बँक निफ्टीमध्येही जबरदस्त घसरण दिसून येत आहे आणि आज तो 800 हून अधिक अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. बँक निफ्टी 863 अंकांच्या किंवा 1.89 टक्क्यांच्या घसरणीसह 44,729 च्या पातळीवर आला आहे.

शेअर बाजाराची स्थिती

गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी रुपये बुडाले

आजच्या प्रचंड घसरणीत, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे आणि त्यांच्या भांडवलात 5 लाख कोटी रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. कालचे बाजार भांडवल 306.80 लाख कोटी रुपये होते, ते आज 301.69 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात

बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांकांवर घसरणीचे वर्चस्व आहे आणि कोणत्याही क्षेत्रात तेजी नाही. याशिवाय सेन्सेक्सच्या शेअर्सवर नजर टाकली तर 30 पैकी फक्त 3 शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 शेअर्सवपैकी केवळ 4 शेअर्स तेजीत आहेत आणि उर्वरित 46 शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

देशांतर्गत शेअर बाजारात आज सर्वत्र घसरण दिसून येत आहे आणि बाजारातील एकूण 3,689 शेअर्सपैकी केवळ 1,062 शेअर्समध्येच वाढ झाली आहे. तर 2491 शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT