Stock Market Holiday Sakal
Share Market

Stock Market Holiday: आज शेअर बाजार बंद राहणार का? NSE-BSE वर कधी होणार ट्रेडिंग?

Stock Market Eid Holiday: आज गुरुवारी देशभरात ईद साजरी होत आहे. यानिमित्ताने शाळा, महाविद्यालये, बँकांसह शेअर बाजारही बंद राहणार आहे. ईदनिमित्त गुरुवारी भारतीय शेअर, रोखे आणि कमोडिटी बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

राहुल शेळके

Stock Market Eid Holiday: आज गुरुवारी देशभरात ईद साजरी होत आहे. यानिमित्ताने शाळा, महाविद्यालये, बँकांसह शेअर बाजारही बंद राहणार आहे. ईदनिमित्त गुरुवारी भारतीय शेअर बाजार, रोखे आणि कमोडिटी बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. (Stock market holiday BSE, NSE closed today on account of Eid Ul Fitr)

ईदच्या दिवशी शेअर बाजार बंद राहतील

ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त 11 एप्रिल रोजी बाजार बंद राहणार असल्याची माहिती BSE आणि NSE दोघांनीही स्वतंत्र अधिसूचनांमध्ये दिली होती. या प्रसंगी, बीएसई आणि एनएसईवर डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

MCX वर ट्रेडिंग होईल का?

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळचे व्यवहार होणार नाहीत आणि संध्याकाळच्या सत्रासाठी बाजार खुला असेल. MCX वर ट्रेडिंग सकाळी 9 ते 5 आणि संध्याकाळी 5 ते 11:30/11:55 पर्यंत होते.

पुढील आठवड्यातही शेअर बाजार बंद राहणार आहे

पुढील आठवड्यातही एक दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. 17 एप्रिल म्हणजेच बुधवारी रामनवमीला सुट्टी आहे. या दिवशी बीएसई, एनएसई, कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्स आणि एनसीडीईएक्स आणि बाँड मार्केटमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

या वर्षी शेअर बाजार कधी बंद राहणार?

पुढील महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 मे रोजी बाजारात महाराष्ट्र दिनाची सुट्टी असेल. 17 जून रोजी बकरी ईद निमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. त्यानंतर 17 जुलै रोजी शेअर बाजारात मोहरमची सुट्टी असेल.

15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारपेठ बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे 2 ऑक्टोबरला गांधी जयंती, 1 नोव्हेंबरला दिवाळी, 15 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आणि 25 डिसेंबरला ख्रिसमसनिमित्त बाजाराला सुट्टी असेल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT