Share Market Sakal
Share Market

Stock Market Holiday: तीन दिवस शेअर बाजार राहणार बंद; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

आज शेअर बाजार, कमोडिटी मार्केट आणि चलन बाजार बंद राहतील

राहुल शेळके

Stock Market Holiday: व्यवसायाच्या दृष्टीने चालू आठवडा खूपच लहान आहे. कारण आज म्हणजे शुक्रवारी सुट्टी आहे. डॉ भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त आज बाजारपेठा बंद राहणार आहेत. आता सोमवारी बाजार सुरू होईल.

BSE वर उपलब्ध माहितीनुसार, 14 एप्रिल रोजी शेअर बाजार, कमोडिटी मार्केट आणि चलन बाजार बंद राहतील. गेल्या आठवड्यातही फक्त 3 दिवस ट्रेडिंग झाले होते. कारण महावीर जयंती आणि गुड फ्रायडेनिमित्त बाजारपेठेत सुट्टी होती.

सोमवारी बाजार उघडेल :

बाजारातील व्यवहारासाठी काल व्यापारी आठवड्याचा शेवटचा दिवस होता. आता थेट 17 एप्रिल रोजी बाजारपेठा उघडतील. कारण डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवारी वीकेंड असेल.

BSE च्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, 1 मे रोजी शेअर बाजारात आणखी एक सुट्टी असेल. कारण महाराष्ट्र दिन सोमवारी म्हणजेच 1 मे रोजी साजरा केला जातो.

Stock Market Holiday List

काल शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. याचे मुख्य कारण म्हणजे मॅक्रो इकॉनॉमी डेटा आणि US FED. अमेरिका आणि भारतातील किरकोळ महागाईच्या आकडेवारीत घसरण झाली आहे.

फेडने जागतिक बाजारावर दबाव आणला आहे. कारण अमेरिकन अर्थव्यवस्थेला यंदा मंदीच्या संकटाचा सामना करावा लागेल, असे सांगण्यात आले.

2023 मध्ये बाजाराची वाटचाल :

2023 मध्ये शेअर बाजारातून चांगला परतावा मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. कारण आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार बाजारातील परतावा चांगला राहिला नाही. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये या वर्षी अर्ध्या टक्‍क्‍यांचीच किरकोळ तेजी पाहायला मिळाली.

मात्र, या काळात आयटी शेअर्सनी चांगली कामगिरी केली आहे. निफ्टी आयटी निर्देशांकाने 2023 मध्ये एक टक्क्यांहून अधिक वाढ दर्शविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चलो मुंबई! शेवटची फाइट, गुलाल उधळूनच परतायचं; जरांगेंचा सरकारला इशारा, २९ ऑगस्टला कसं असेल नियोजन

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! बटाट्यासह शिजवलेला बेडूक, भातात किडे, कडू चपात्या अन्...; वसतिगृहातील मेनू पाहून बसेल धक्का

Trending News : AI ची कमाल ! महिलेला मिळाला २५ वर्षांपूर्वी गेलेला आवाज, नेमका कसा घडला चमत्कार?

Latest Marathi News Updates : गणेशोत्सव समन्वय समितीची पालिकेकडे मागणी

Joint Pain: पावसाळ्यात सांधेदुखी का वाढते? जाणून घ्या उपचार कसे करावे

SCROLL FOR NEXT