Stock Market Holiday Sakal
Share Market

Stock Market Holiday: रामनवमी निमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पहा सुट्ट्यांची यादी

Stock Market Holiday: 17 एप्रिल रोजी देशभरात रामनवमीचा सण साजरा केला जाणार आहे. रामनवमीला देशातील बहुतांश शाळा आणि कार्यालये बंद आहेत. देशभरात साजरी होणारी राम नवमी ही भगवान रामाची जयंती म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मातील हा महत्त्वाचा सण चैत्र महिन्यात येतो.

राहुल शेळके

Stock Market Holiday: 17 एप्रिल रोजी देशभरात रामनवमीचा सण साजरा केला जाणार आहे. रामनवमीला देशातील बहुतांश शाळा आणि कार्यालये बंद आहेत. देशभरात साजरी होणारी राम नवमी ही भगवान रामाची जयंती म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मातील हा महत्त्वाचा सण चैत्र महिन्यात येतो. स्टॉक मार्केट कॅलेंडरनुसार, शेअर बाजार म्हणजेच BSE आणि NSE बुधवारी, 17 एप्रिल रोजी रामनवमी निमित्त बंद राहतील.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने जारी केलेल्या शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमीच्या निमित्ताने बाजार बंद राहतील. यासह, इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह आणि एसएलबी सेगमेंटमधील व्यवहार बुधवारी बंद राहतील. मल्टी कमोडिटी एक्सचेंज देखील पहिल्या सत्रासाठी बंद राहील आणि दुसऱ्या सत्रासाठी म्हणजे संध्याकाळी 5 ते रात्री 11.30 दरम्यान उघडेल.

2024 मध्ये 'या' दिवशी शेअर बाजारात सुट्ट्या असणार-

  • 1 मे 2024 - महाराष्ट्र दिन

  • 17 जून 2024- बकरी ईद

  • 17 जुलै 2024- मोहरम

  • 15 ऑगस्ट 2024 - स्वातंत्र्य दिन

  • 2 ऑक्टोबर 2024- गांधी जयंती

  • 1 नोव्हेंबर 2024- दिवाळी

  • 15 नोव्हेंबर 2024- गुरु नानक जयंती

  • 25 डिसेंबर 2024- ख्रिसमस

या राज्यांतील बँकांनाही सुट्टी असणार-

शेअर बाजाराव्यतिरिक्त अनेक राज्यांतील बँकांना उद्या रामनवमीनिमित्त सुट्टी असेल. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, पाटणा, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूर येथे 17 एप्रिल रोजी बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत जर तुम्ही या शहरांमध्ये राहत असाल तर तुम्ही तुमची कामे अगोदरच पूर्ण करा.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup सामन्यात फुल राडा! विदर्भाचा गोलंदाज अन् दिल्लीकर फलंदाज एकमेकांच्या अंगावर गेले धावून, पाहा Viral Video

Latest Marathi News Live Update : आठवले गटाचा दणका आंदोलनाची घेतली दखल

Shahu Maharaj: 'हे' दोन मराठा तरुण होते म्हणून औरंगजेब बालछत्रपतींचे धर्मांतर करु शकला नाही, जाणून घ्या त्यागाचा इतिहास

Avoid Junk Food: आकर्षक पॅकेजिंग, चमचमीत चवीला म्हणा 'नो'! घरीच बनवलेल्या पौष्टिक पर्यायांनी जपा आरोग्य

Jaggery Health Benefits: दररोज सुपारीएवढा गूळ देतो ताकद, शुद्धी आणि आरोग्याचे चांगले फायदे

SCROLL FOR NEXT