Stock Market Updates Sensex, Nifty Hit All-time High Levels In Special Trading Session  Sakal
Share Market

Share Market Opening: विशेष ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार नव्या विक्रमी उच्चांकावर, निफ्टीने पार केला 22400चा टप्पा

Share Market Today: विशेष ट्रेडिंग सत्रात शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला. सेन्सेक्स 73881 अंकांवर तर निफ्टी 22407 अंकांवर उघडला. आज शनिवारी शेअर बाजार एका खास कारणासाठी खुला आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 2 March 2024 (Marathi News): विशेष ट्रेडिंग सत्रात शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला. सेन्सेक्स 73881 अंकांवर तर निफ्टी 22407 अंकांवर उघडला. आज शनिवारी शेअर बाजार एका खास कारणासाठी खुला आहे. डिजास्टर रिकवरी साइटची चाचणी NSE आणि BSE द्वारे केली जाणार आहे, ज्यामुळे बाजार खुला आहे. पहिले सत्र प्राथमिक ठिकाणी तर दुसरे सत्र डिजास्टर रिकवरी साइटवर असेल.

शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सत्रात निफ्टीने 22400 च्या वरच्या पातळीवर सुरुवात केली. जवळपास सर्वच क्षेत्रात थोडीफार खरेदी होताना दिसत आहे.

शेअर बाजार नव्या विक्रमी उच्चांकावर

एल अँड टी, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कंझ्युमर्स, इंडसइंड बँक, टायटन कंपनी, जेएसडब्ल्यू स्टील, ग्रासिम इंडस्ट्रीज हे शेअर्स मोठ्या वाढीसह उघडले. दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, एनटीपीसी, बीपीसीएल यांसारखे शेअर्स घसरणीसह उघडले. शुक्रवारी बाजारातील तुफान वाढीनंतर आज विशेष व्यापार सत्रात खरेदीदारांकडून उत्सुकता दिसून येत आहे.

S&P BSE SENSEX

इंट्राडे ट्रेडिंग होणार नाही

शेअर बाजारात शनिवारी दोन सत्रात व्यवहार करता येतील. पहिल्या सत्रात सकाळी 9:15 ते सकाळी 10:00 पर्यंत व्यवहार होणार आहे. शेअर बाजाराचे दुसरे ट्रेडिंग सत्र हे डिझास्टर रिकव्हरी साइटवर होणार आहे जे सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 या वेळेत होणार आहे.

शुक्रवारी, जीडीपीच्या चांगल्या आकडेवारीनंतर बाजाराने मोठी झेप घेतली होती. शुक्रवारी सेन्सेक्स 1,245.05 अंकांच्या किंवा 1.72 टक्क्यांच्या वाढीसह 73,745.35 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 355.95 अंकांनी किंवा 1.62 टक्क्यांनी झेप घेऊन 22,338.75 अंकांवर राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर,काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT