Share Market sakal
Share Market

Share Market मध्ये घसरण असतानाही हा शेअर तेजीत, तुमच्याकडे आहे का?

कंपनीने 6 कोटी 0 टक्के फुल्ली कन्हर्टीबल डिबेंचर्सना (OFCD) इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय वापरला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market : सनफ्लॅग आयर्न अँड स्टील (Sunflag Iron Share) या हाय क्वालिटी स्पेशल स्टील बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्स बाजाराच्या अस्थिर वातावरणातही दमदार कामगिरी करत आहेत. सनफ्लॅग आयर्न अँड स्टीलच्या शेअर्सने कमकुवत बाजारात नवा उच्चांक गाठला. (Sunflag Iron share have in growth while share market is down)

सनफ्लॅग आयर्नचा शेअर 7 टक्क्यांनी वाढून 162.55 रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला. मागच्या दोन व्यापार दिवसांत तो 14 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने ( Lloyds Metals and Energy Limited) 11 टक्‍क्‍यांहून अधिक स्‍टॉक खरेदी केल्‍यामुळे त्‍याच्‍या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. गेल्या वर्षी 1 एप्रिल 2022 रोजी तो 62.10 रुपयांवर होता, जो एक वर्षाचा निचांक आहे.

कंपनीने 6 कोटी 0 टक्के फुल्ली कन्हर्टीबल डिबेंचर्सना (OFCD) इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय वापरला आहे. या अंतर्गत, या डिबेंचर्सचे 1:1 च्या प्रमाणात प्रत्येकी 1 रुपये फेस व्हॅल्यू असणारे शेअर्स 6 कोटी इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करण्यात आले आहे. याद्वारे सनफ्लॅग आयर्नला लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडमध्ये (LMEL) 11.89 स्टेक मिळाला आहे.

ही कंपनी माइल्ड-स्टील आणि अलॉय स्टीलचे प्रॉडक्ट्स तयार करते. हे रोल्ड प्रॉडक्ट्स, बिलेट्स/ब्लूम्स, इंगॉट्स आणि ब्राइट बार्सचे उत्पादन करते. ज्याचा वापर प्रामुख्याने ऑटोमोटिव्ह ट्रान्समिशन गीअर्स, ड्राईव्ह शाफ्ट्स, स्टीयरिंग सिस्टम, बेअरिंग्स, एक्झॉस्ट सिस्टम आणि इतर इंजिन घटक बनवण्यासाठी केला जातो.

हे प्रॉडक्ट्स रेल्वे ऑर्डनन्स फॅक्टरीज, पॉवर सेक्टर्स आणि जनरल इंजिनिअरिंगच्या इतर क्षेत्रांना ऍप्लीकेशन कंपोनेंट्स तयार करण्यासाठी वापरले जातात.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT