Tata Group Sakal
Share Market

Tata Group: टाटा समूहाच्या 'या' दोन कंपन्या होणार विलीन; गुंतवणूकदारांवर होणार मोठा परिणाम

Tata Motors: टाटा मोटर्स, टाटा कॅपिटल आणि टाटा मोटर्स फायनान्सच्या बोर्डांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) च्या व्यवस्था योजनेअंतर्गत या विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. टाटा मोटर्सने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की विलीनीकरण पूर्ण होण्यास सुमारे एक वर्ष लागेल.

राहुल शेळके

Tata Motors: संचालक मंडळाने टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेडचे ​​टाटा कॅपिटल लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. हा करार शेअर स्वॅपद्वारे पूर्ण केला जाणार आहे. देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने मंगळवारी जाहीर केले की टाटा मोटर्स फायनान्सचे शेअर्स स्वॅप डील अंतर्गत NBFC टाटा कॅपिटलमध्ये विलीन केले जातील.

या विलीनीकरणाचा फायदा दोन्ही कंपन्या आणि त्यांच्या ग्राहकांना होणार आहे. योजनेनुसार, टाटा मोटर्स फायनान्सच्या भागधारकांना प्रत्येक 100 इक्विटी शेअरमागे टाटा कॅपिटलचे 37 इक्विटी शेअर्स मिळतील, असे कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

नवीन कंपनीत टाटा मोटर्सचा 4.7 टक्के हिस्सा आहे

टाटा मोटर्स, टाटा कॅपिटल आणि टाटा मोटर्स फायनान्सच्या बोर्डांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) च्या व्यवस्था योजनेअंतर्गत या विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. टाटा मोटर्सने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की विलीनीकरण पूर्ण होण्यास सुमारे एक वर्ष लागेल.

करार पूर्ण झाल्यानंतर, नवीन कंपनीत टाटा मोटर्सची 4.7 टक्के भागीदारी असेल. या विलीनीकरणाचा टाटा मोटर्स फायनान्सच्या ग्राहकांवर किंवा कर्जदारांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे.

टाटा कॅपिटल अनेक प्रकारची कर्जे देते

टाटा कॅपिटल वाहन कर्ज तसेच घर आणि शैक्षणिक कर्ज देखील देते. टाटा मोटर्सचा शेअर मंगळवारी NSE वर 4.79 टक्क्यांनी घसरून 904.95 रुपयांवर बंद झाला. आर्थिक वर्ष 2024 मध्ये टाटा कॅपिटलचा निव्वळ नफा 3150 कोटी रुपये होता. याच काळात टाटा मोटर्स फायनान्सचा निव्वळ नफा 52 कोटी रुपये होता. मात्र, या कराराला नियामक मंजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT