TCS sets November 25 as record date for Rs 17,000-crore share buyback  Sakal
Share Market

TCS News: सहा वर्षात पाचव्यांदा शेअर बायबॅक; कंपनी 17 हजार कोटी रुपये खर्च करणार, काय आहे रेकॅार्ड डेट?

TCS News: TCS ने 11 ऑक्टोबर रोजी 17,000 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकची घोषणा केली होते.

राहुल शेळके

TCS News: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCSने (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) 17,000 कोटी रुपयांच्या बायबॅकसाठी 25 नोव्हेंबर ही तारीख ठरवली आहे. कंपनीच्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. TCS ने 11 ऑक्टोबर रोजी 17,000 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकची घोषणा केली होती.

बायबॅक किंमत 4,150 रुपये

बायबॅकमध्ये कंपनी 4.09 कोटी (4,09,63,855 ) शेअर्स खरेदी करेल, जे एकूण पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या 1.12% आहे. 2017 नंतर कंपनीचा हा पाचवा बायबॅक असेल. कंपनीने बायबॅकची किंमत 4,150 रुपये निश्चित केली आहे, TCS चे शेअर्स बुधवारी 3,408.60 रुपयांवर बंद झाले.

11 ऑक्टोबर रोजी बायबॅकची घोषणा झाल्यापासून, TCS चे शेअर्स 3.9% ने घसरले आहेत. सध्या टीसीएसमध्ये प्रवर्तकांचा वाटा 72.30% आहे.

TCS सहा वर्षांत पाचव्यांदा शेअर्स खरेदी करत आहे

टीसीएस सहा वर्षांत पाचव्यांदा आपले शेअर्स बाय बॅक करणार आहे. यापूर्वी, कंपनीने 2017, 2018, 2020 आणि 2022 मध्ये बायबॅक केले होते. आतापर्यंत 66 हजार कोटी रुपयांचे शेअर्स विकत घेतले होते.

आता कंपनी 17 हजार कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करणार आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी 2017 मध्ये, कंपनीने 16 हजार कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते.

यानंतर, जून 2018 मध्ये, 16 हजार कोटी रुपयांच्या शेअर्सपैकी 18 टक्के शेअर्सची खरेदी परत करण्यात आली आणि ऑक्टोबर 2020 मध्येही 16 हजार कोटी रुपयांच्या शेअर्सपैकी 10 टक्के शेअर्स प्रीमियमने खरेदी करण्यात आले. यानंतर, जानेवारी 2022 मध्ये, कंपनीने 17 टक्के प्रीमियमवर भागधारकांकडून 18 हजार कोटी रुपयांचे शेअर्स परत विकत घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT