TCS Share Price Sakal
Share Market

Tata Group: रतन टाटा मालामाल! 5 मिनिटांत कमावले 22,450 कोटी, केला नवा विक्रम

TCS Share Price: गेल्या काही दिवसांपासून टाटा समूहाची सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात कंपनीने अवघ्या 5 मिनिटांत 22,450 कोटी रुपये कमावले आहेत.

राहुल शेळके

TCS Share Price: गेल्या काही दिवसांपासून टाटा समूहाची सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात कंपनीने अवघ्या 5 मिनिटांत 22,450 कोटी रुपये कमावले आहेत.

कंपनीच्या शेअर्सनी विक्रमी पातळी गाठली आहे. अर्थसंकल्पाच्या दिवसापासून कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून या कालावधीत कंपनीला 34,500 कोटी रुपयांहून अधिक नफा झाला आहे.

5 मिनिटांत 22,450 कोटी रुपये कमावले

कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 5 मिनिटांत विक्रमी पातळी गाठली. त्यामुळे टीसीएसच्या मूल्यांकनात प्रचंड वाढ झाली. आकडेवारीनुसार, कंपनीचे मार्केट कॅप एका दिवसापूर्वी 15,64,063.05 कोटी रुपयांवर होते.

आज शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर मार्केट कॅप 15,86,513.28 कोटी रुपयांवर आले आहे. याचा अर्थ कंपनीच्या मूल्यांकनात 22,450.23 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

कंपनीचे शेअर्स विक्रमी पातळीवर

बीएसईच्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. बाजार उघडल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांत कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक गाठला.

माहितीनुसार, सकाळी 9.20 वाजता कंपनीच्या शेअर्सने 4,384.95 रुपयांची विक्रमी पातळी गाठली. गुरुवारच्या तुलनेत कंपनीच्या शेअर्समध्ये 1.44 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

विशेष बाब म्हणजे अर्थसंकल्पाच्या दिवसापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 2.22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 22 जुलै रोजी कंपनीचे शेअर्स 4,289.61 रुपयांवर होते. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये 95.34 रुपयांची वाढ झाली आणि शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT