Donald Trump Stock Sakal
Share Market

Donald Trump: हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प झाले मालामाल; एका दिवसात शेअर्समधून कमावले इतके बिलियन डॉलर

Attack on Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे निवडणूक रॅलीदरम्यान हल्ला झाला. या हल्ल्यात गोळी त्यांच्या कानाला लागली मात्र त्यांची प्रकृती ठीक आहे.

राहुल शेळके

Donald Trump Stock: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे निवडणूक रॅलीदरम्यान हल्ला झाला. या हल्ल्यात गोळी त्यांच्या कानाला लागली मात्र त्यांची प्रकृती ठीक आहे. या हल्ल्यानंतर त्यांच्या मीडिया कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

हल्ल्यानंतर सोमवारी ट्रम्प यांच्या सोशल मीडिया कंपनीचे मूल्य वाढले. प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी ग्रुपच्या शेअरची किंमत 53 टक्क्यांनी वाढली. मार्चच्या उत्तरार्धात कंपनीच्या स्थापनेनंतर ही एका दिवसातील सर्वात मोठी तेजी आहे.

ट्रुथ सोशल मधील ट्रम्प यांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीचे मूल्य वेगाने वाढत आहे. सध्याच्या किमतीनुसार, ट्रम्प मीडियामध्ये त्यांचे 114.75 दशलक्ष शेअर्सचे मूल्य अंदाजे 5.6 अब्ज डॉलर झाले आहे. ट्रम्प हे क्रिप्टोकरन्सीचे समर्थक आहेत. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर, बिटकॉइन या सर्वाधिक व्यापार केलेल्या क्रिप्टोकरन्सीमध्ये 2.1 टक्क्यांनी वाढ झाली आणि किंमत 59,849.84 डॉलर वर गेली.

जेल ऑपरेटर कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ झाली

क्रिप्टो एक्सचेंज Coinbase Global, bitcoin miners Riot Platforms Inc. आणि Marathon Digital चे शेअर्स 6 ते 7 टक्क्यांनी वाढले आहेत. जेल ऑपरेटर Jio Group आणि CoreCivic चे शेअर्स देखील सुमारे 7 टक्क्यांनी वाढले आहेत.

ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यास बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे डिटेन्शन सेंटरची मागणी वाढू शकते. तोफ उत्पादक स्मिथ अँड वेसन ब्रँड्सच्या शेअरमध्ये 2.7 टक्के वाढ झाली आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर फुनवरे यांच्या शेअरमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT